PM Narendra Modi
PM Narendra Modi esakal
देश

''भारतानं कोणत्याही देशाला, समाजाला धोका निर्माण केलेला नाही''

सकाळ डिजिटल टीम

भारतानं कधीही कोणत्याही देशाला किंवा समाजाला धोका निर्माण केलेला नाही.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त (400th Birth Anniversary of Guru Tegh Bahadur) लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित केलं. यावेळी मोदींनी गुरु तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ 400 रुपयाचं नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण केलं. या दोन दिवसीय दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागातून नागरिक इथं पोहोचत आहेत.

आज संपूर्ण देश आपल्या गुरूंच्या आदर्शांवर चालत आहे, याचा मला आनंद आहे. या किल्ल्यानं गुरु तेग बहादूर साहिब यांचं हौतात्म्य पाहिलंय. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर लाल किल्ल्यावर आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय खास आहे. आज आपण जिथं आहोत, ते स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळं, असं मोदी म्हणाले. गुरूंनी आपल्या देशाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. ही महान भूमी आहे. आज भारताकडं पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदललाय, या मला सार्थ अभिमान आहे, असंही त्यांनी सांगितलं.

गुरू तेग बहादूरजींच्या बलिदानानं भारतातील अनेक पिढ्यांना त्यांच्या संस्कृतीचा सन्मान राखण्याची प्रेरणा मिळालीय. हा किल्ला साक्षीदार आहे. औरंगजेब आणि त्याच्यासारख्या जुलमींनी अनेकांची मुंडकी उडवली, पण ते कोणाचा विश्वास बदलू शकले नाहीत, ही या देशाची ताकद आहे. गुरूंनी संस्कृतीच्या रक्षणासाठी स्वतःचं बलिदान दिलंय. ते अमर आहेत, असंही मोदी म्हणाले.

गेल्या वर्षीच आमच्या सरकारनं साहिबजादांच्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. आमचं सरकार शीख परंपरेतील तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. श्री गुरु ग्रंथ साहिब जी आपल्यासाठी आत्म-साक्षात्काराचं मार्गदर्शक, तसंच भारताच्या विविधतेचं आणि एकतेचं जिवंत स्वरूप आहे. भारतानं कधीही कोणत्याही देशाला किंवा समाजाला धोका निर्माण केलेला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो. जेव्हा आपण स्वावलंबी भारताबद्दल बोलतो, तेव्हा आपण संपूर्ण जगाची प्रगती हे ध्येय समोर ठेवतो, असं त्यांनी सांगितलं.

जगात भारत पुढं जात असून, आज पुन्हा एकदा जगाचं लक्ष भारताकडं लागलंय. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानं शेजारील देशांतून येणाऱ्या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व दिलं आहे. आपल्या गुरूंनी आपल्याला मानवतेच्या मार्गावर पुढं जाण्याची शिकवण दिल्यानं हे शक्य झाल्याचं मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT