Untitled-2.jpg
Untitled-2.jpg 
देश

पंतप्रधान मोदी म्हणतात...म्हणून तर माझ्या चेहऱ्यावर कायम तेज असते

वृत्तसंस्था

दिल्ली : मी स्वत:च्या घामाने चेहऱ्यावर मसाज करतो. त्यामुळे माझा चेहरा नेहमी तजेलदार दिसतो, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीत राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी या लहानग्यांना मार्गदर्शन केले. या संभाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांना काही प्रश्नही विचारले. 

सौजन्य ः आऊटलूक मॅगझिन

तुमच्यापैकी कितीजण मेहनत करून घाम गाळतात. लहान मुलांना दिवसातून चार वेळा घाम येणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी मला प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्या चेहेऱ्यावर तेज का दिसते? त्यावेळी मी उत्तर दिलं होतं की दिवसभर मी प्रचंड मेहनत करतो. त्यामुळे मला घाम येतो आणि त्याच घामाने मी मसाज करत असल्याचे मोदी यांनी म्हटले. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. 

मध्यंतरी काँग्रेस नेते अल्पेश ठाकोर यांनी नरेंद्र मोदी गोरेपणासाठी दररोज चार लाख रुपये किंमतीचे मशरुम खात असल्याचा दावा केला होता. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदींचा चेहरा काळा होता. मात्र, परदेशातून आयात केल्या जाणारे मशरुम खाऊन त्यांचा रंग उजळला आहे. हे मशरुम तैवानमधून मागवले जातात. या एका मशरूमची किंमत ८० हजार रूपये आणि मोदी रोज चार लाख रूपयांचे मशरूम खातात. एका महिन्यात मोदी केवळ मशरूम खाण्यासाठी एक कोटी २० रूपये खर्च करतात, असे अल्पेश ठाकोर यांनी म्हटले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT