PM Narendra Modi
PM Narendra Modi  
देश

Agnipath : तीनही संरक्षण दलाचे प्रमुख उद्या घेणार PM मोदींची भेट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तीनही संरक्षण दलाचे प्रमुख उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे तीनही दलाचे प्रमुख स्वतंत्र्यपणे भेट घेणार आहेत. यामध्ये नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार प्रथम पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचे सांगितले जात आहेत. याबाबत इंडिया टुडेने वृत्त प्रकशित केले आहे. (Agnipath Scheme Protests News)

नवीन लष्करी योजनेंतर्गत अग्निवीरांची भरती सुरू करण्यासाठी तीन संरक्षण सेवांनी आधीच अधिसूचना जारी केल्या आहेत. लष्कराने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्जदारांची ऑनलाइन नोंदणी पुढील महिन्यात सुरू होणार आहे. लष्कराने सांगितले की, अग्निवीर भारतीय सैन्यात एक वेगळी रँक तयार करण्यात आली, जी इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा वेगळी आहे. अग्निवीराना चार वर्षांच्या सेवेच्या कालावधीत देण्यात आलेली माहिती उघड करण्यास प्रतिबंध असतील.

'अग्निवीर' उमेदवारांना द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र

केंद्राच्या नवीन लष्करी भरती योजना 'अग्निपथ' (Agnipath) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ते देशभरात होत असलेल्या कोणत्याही हिंसक निदर्शने किंवा जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभागी नव्हते असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.

रविवारी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना, लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव, लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले, सर्व अग्निवीरांना प्रतिज्ञापत्र देऊन हे स्पष्ट करावे लागेल की त्यांनी कधीच अशा कोणत्याही हिंसक निदर्शनात किंवा जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभाग घेतला नाही. ते म्हणाले, शिस्त ही सशस्त्र दलांची मूलभूत गरज आहे. कोणत्याही उमेदवाराविरुद्ध एफआयआर असल्यास ते त्यात सहभागी होऊ शकत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT