PM Modi in Delhi Metro eSakal
देश

PM Modi in Delhi Metro : दिल्लीकरांना मिळालं मोठं सरप्राईज! PM मोदींनी केला मेट्रोमधून प्रवास, प्रवाशांशी मारल्या गप्पा

ते दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते.

Sudesh

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील नागरिकांना शुक्रवारी सकाळी एक मोठं सरप्राईज दिलं. त्यांनी आज सकाळी दिल्लीच्या मेट्रोमधून प्रवास केला. यावेळी मेट्रोमध्ये असलेल्या प्रवाशांशी त्यांनी गप्पाही मारल्या. ते दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते.

नेहमीप्रमाणे मेट्रोमधून प्रवासासाठी निघालेल्या दिल्लीकरांना यामुळे आश्चर्याचा मोठा धक्का बसला. थेट पंतप्रधानांशी भेट झाल्यामुळे हे प्रवासी अतिशय आनंदात होते. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. "डीयूमधील कार्यक्रमाला जाताना दिल्ली मेट्रोमध्ये तरुण-तरुणींसोबत प्रवास करून आनंद झाला" अशा आशयाचं कॅप्शन देत पंतप्रधानांनी पोस्ट केली आहे.

शताब्दी समारंभात उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते विद्यापीठातील विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करतील. तसेच, विद्यापीठाच्या तीन नव्या इमारतींची पायाभरणी देखील ते करतील.

दिल्ली विद्यापीठाची स्थापना १ मे १९२२ साली करण्यात आली होती. यानंतर या विद्यापीठाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. दिल्ली विद्यापीठाअंतर्गत आज ८६ विभाग, ९० विद्यालये आणि ६ लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत.

विद्यार्थ्यांना निर्देश

दरम्यान, या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. कोणत्याही कारणास्तव आज गैरहजर राहता येणार नाही, अशी सूचना दिली आहे. तसेच, कार्यक्रमाला येताना विद्यार्थ्यांना काळ्या रंगाचे कपडे घालण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पांढऱ्या किंवा अन्य रंगाचे कपडे घालूनच कार्यक्रमाला यावं, असं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT