Arvind Kejriwal Sakal
देश

Arvind Kejriwal : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी काम करण्याऐवजी विरोधकांना फसविण्यासाठी षडयंत्र; अरविंद केजरीवाल

विविध गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ‘आप’चे आतापर्यंत तीन नेते कारागृहात गेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी काम करण्याऐवजी विरोधकांना खोट्या प्रकरणात फसविण्यासाठी षडयंत्र करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. विविध गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ‘आप’चे आतापर्यंत तीन नेते कारागृहात गेले आहेत. याशिवाय एका आमदाराची दिल्ली दंगल व मनी लॉँड्रींगच्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे.

यात केजरीवाल यांच्या विरोधात जबाव देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप होत आहे. यासंदर्भात ‘एक्स’ या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले, ‘‘२०१५ पासून मला खोट्या आरोपात अडकविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहेत. लोकांवर विविध प्रकारचे दबाव टाकून माझ्या विरोधात जवाब नोंदविण्यासाठी सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करण्याऐवजी २४ तास विरोधकांना खोट्या प्रकरणात फसविण्याचे षडयंत्र करत आहेत.’’

‘आप’ला आरोपी करण्याचा विचार

बहुचर्चित मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात आम आदमी पक्षाला आरोपी करण्यासंदर्भात विचार सुरु असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयाकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी तपास संस्थांची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी ‘आप’ला आरोपी बनविण्यासंदर्भात विचार सुरु असल्याचे न्यायालयात सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी

Diamond Found 300 kg : अन्नाला महाग असलेल्या देशात सापडला ३०० किलोचा हिरा, राष्ट्रपतींचा तातडीचा निर्णय चर्चेत

Latest Marathi News Update LIVE : नगरपरिषद निवडणूकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंधू आल्हाद कलोती बिनविरोध

Solapur News: '१५ दिवसांत केला प्रलंबित १७ हजार दाखल्यांचा निपटारा'; जन्म-मृत्यू विभागात कर्मचारी वाढवून, सुट्या रद्द करून कामात आणली गती

Pune Police : विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांचा शिक्षण संस्थांबरोबर विशेष उपक्रम

SCROLL FOR NEXT