देश

Republic Day : प्रजासत्ताक दिन सोहळ्याला पंतप्रधान मोदींनी घातला विशेष फेटा; प्रभू श्रीरामाशी आहे कनेक्शन

प्रजासत्ताक दिन सोहळ्याला पंतप्रधान मोदींनी घातला विशेष फेटा...

Aishwarya Musale

15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन असो की 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पोशाख नेहमीच चर्चेत असतो. यावेळीही त्यांचा पिवळा फेटा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांचा फेटा प्रभू श्रीरामाला समर्पित असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी म्हणजेच 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वीच पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचले होते. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान उपस्थित होते. यावेळी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत.

यावर्षी पंतप्रधान मोदी यांनी पांढरा कुर्ता-पायजमासोबत, जॅकेट आणि बांधणी प्रिंट फेटा परिधान केला आहे. जो रंगीबेरंगी आहे. त्यांच्या फेट्यामध्ये अनेक रंग असले तरी पिवळा रंग सर्वात जास्त उठून दिसत होता.

2022 मध्ये पंतप्रधान मोदींनी उत्तराखंड टोपी घातली होती. 2021 मध्ये पीएम मोदी जामनगरची पगडी परिधान करून आले होते. तेव्हा त्यांना गुजरातच्या जामनारच्या राजघराण्याने पगडी भेट दिली होती. 2020 मध्ये पीएम मोदी भगव्या फेट्यामध्ये दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT