PM Modi Nepal Visit ANI
देश

मोदींनी सांगितली आजीची आठवण; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांशी बोलताना म्हणाले...

आई- वडील सोबत नसताना तुमची जबाबदारी आणखी वाढते, असंही मोदी म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान मोदींच्या सरकारला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मोदींनी पीएम केअर फॉर चिल्ड्र्न या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना सोपवली. याच कार्यक्रमात त्यांनी या मुलांना आपल्या आजीची एक गोष्टही सांगितली. (PM Narendra Modi PM Care for Children Scheme)

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांना मोदींनी पत्राद्वारे ही गोष्ट सांगितली आहे. ते पत्रात लिहितात, "आजच्या दिवशी २७ मे रोजी १०० वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबालाही अशाच एका दुःखाला सामोरं जावं लागलं. एका शतकापूर्वी जेव्हा जग आजच्या सारखंच साथीच्या आजाराच्या विळख्यात होतं, तेव्हा माझ्या आईने तिची आई गमावली. माझी आई यावेळी इतकी लहान होती की तिला आपल्या आईचा चेहराही आठवत नाही. त्यामुळे माझ्या आईला बालपणी तिच्या आईची माया मिळू शकली नाही."

या मुलांचं सांत्वन करताना मोदी म्हणाले, "म्हणूनच आज मी तुमच्या मनातल्या व्यथा, तुमच्या आतील दुःख समजू शकतो. पालकांची माया मुलांसाठी नेहमीच आधार असते. तुमच्या पालकाने तु्म्हाला आत्तापर्यंत योग्य आणि अयोग्य, चांगलं, वाईट यातला प्रत्येक फरक सांगितला, मार्गदर्शन केलं. पण आज जेव्हा ते तुमच्या सोबत नाहीत, तेव्हा तुमच्या जबाबदाऱ्या अधिक वाढतात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

SCROLL FOR NEXT