Narendra Modi 
देश

#RepublicDay2020 : पंतप्रधानांनी सुरु केली नवी परंपरा; अमर जवान ज्योती ऐवजी... 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दरवर्षीची परंपरा मोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा प्रजासत्ताकदिनी अमर जवान ज्योती ऐवजी नव्याने निर्मित राष्ट्रीय युद्ध स्मारकात (वॉर मेमोरियल) जाऊन हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते. 

भारत-पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धातील हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची "इंडिया गेट'वर 1972 मध्ये स्थापना करण्यात आली होती. तिन्ही सेना दलांचे प्रमुख स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी अमर जवान ज्योती येथे आदरांजली वाहतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (26 जानेवारी) सकाळी राजपथावरील संचलन सुरू होण्याआधी 'वॉर मेमोरियल' येथे जाऊन हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांच्या आणि सरसेनाध्यक्षांच्या उपस्थितीत हुतात्मा जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. केवळ पंतप्रधान मोदीच राष्ट्रीय युद्ध स्मारकात पुष्पचक्र अर्पण केले. 

राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती 40 एकर परिसरात करण्यात आली आहे. अमर, वीरता, त्याग आणि रक्षक अशा चार चक्रांनी ते बनले आहे. यात 25 हजार 342 जवानांची नावे ग्रेनाइटवर सुवर्णाक्षरांत कोरली आहेत. हे युद्ध स्मारक भारताने 1962मध्ये झालेले भारत-चीन युद्ध, तसेच भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या 1947, 1965, 1971 व 1999च्या युद्धांसोबतच श्रीलंकेत पाठवण्यात आलेल्या शांती सेनेतील आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेदरम्यान हुतात्मा झालेल्या सैनिकांना समर्पित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT