Narendra Modi
Narendra Modi 
देश

प्रेरणेची गगनचुंबी प्रतिमा उभी राहिली : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था

केवडिया : मुख्यमंत्री असताना मी याचा कल्पना मांडली होती आणि आता पंतप्रधान म्हणून मी याचे उद्घाटन केले. मी स्वतःला हे भाग्य लागल्याबद्दल धन्य मानतो. गुजरातमधील जनतेने मला जे अभिनंदन पत्र दिले आहे, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची ही प्रेरणेची गगनचुंबी प्रतिमा उभी राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

जगातील सर्वांत उंच ठरणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 182 मीटर उंच पुतळ्याचे अनावरण आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. अमेरिकेतील प्रख्यात स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा दुप्पट उंचीचा सरदार पटेल यांचा हा पुतळा नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाजवळील साधू बेटावर उभारण्यात आला आहे. सरदार पटेल अमर रहे, अमर रहे, देश की एकता जिंदाबाद, जिंदाबाद अशा घोषणा यावेळी मोदींनी दिल्या.

मोदी म्हणाले, की भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी देशभरात रन फॉर युनिटी सुरु करण्यात आली. हजारो वर्षांपासून सुरु असलेली आपली सभ्यता आता फुलत आहे. देशाच्या इतिहासात असे अनेक क्षण येतात की मिटवू शकत नाही. जमिनीपासून आकाशापर्यंत सरदार पटेल यांचा अभिषेक होत आहे आणि नवा इतिहास रचला जात आहे. देशभरातील नागरिकांनी या पुतळ्याच्या निर्माणासाठी सहभाग नोंदविला आहे. लोखंड आणि तांबे देशभरातून जमा करण्यात आली. जगातील हा सर्वांत पुतळा सर्वांना सतत प्रेरणा देत राहिल. भारताच्या इतिहासात आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील राजा-महाराजांचे एक संग्रहालय उभारण्याचे माझी इच्छा आहे. सरदार पटेल यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य होते. भारताच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणाऱ्यांसाठी हा पुतळा उत्तर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT