Donald Trump, Narendra Modi
Donald Trump, Narendra Modi 
देश

प्रेमाचे प्रतिक ट्रम्प-मेलानिया पाहणार, पण मोदी...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानियासह जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलला भेट देणार आहेत, पण, त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नसणार आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमाचे प्रतिक असलेला ऐतिहासिक ताजमहलला ट्रम्प सपत्नीक भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या या भेटीवेळी पंतप्रधान मोदी व भारताकडून इतर कोणीही उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात त्यांची कन्या इव्हांका आणि जावई जेरेड कुशनेर हेही त्यांच्यासोबत येणार आहेत. ट्रम्प यांच्याबरोबर उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात येणार आहे. ट्रम्प हे अहमदाबादमध्ये 24 फेब्रुवारीला दाखल होणार असून, मोदी त्यांच्या स्वागताला असणार आहेत. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास आग्रा येथे ताजमहल पाहण्यासाठी जाणार आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते दिल्लीत 25 फेब्रुवारीला असणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT