Narendra Modi
Narendra Modi 
देश

'वन नेशन, वन इलेक्शन'वर सर्वपक्षीय बैठक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभांच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेली सर्वपक्षीय प्रमुखांची बैठक उद्या (ता. 19) होणार असून, त्यात स्वातंत्र्यलढ्याचा हीरक महोत्सवी सोहळा आणि महात्मा गांधींच्या दीडशेवी जयंती कार्यक्रमावरही चर्चा होणार आहे. मात्र या बैठकीतील सहभागाबाबत विरोधी पक्षांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. कॉंग्रेस आणि यूपीएतील घटक पक्षांची उद्या सकाळी अनौपचारिक बैठक होणार त्यानंतर निर्णय होईल, असे कळते. 

मोदींनी मागील सरकारच्या काळात एकत्रित निवडणुकांचे सूतोवाच केले होते. मात्र आता दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंत संसद अधिवेशनाला सुरवात होण्याआधीच त्यांनी पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्षांसमोर हा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडून सरकार अंमलबजावणीसाठी आग्रही असल्याचेही स्पष्ट संकेत दिले आहेत. 

अर्थात, एकत्रित निवडणुकांच्या सूचनेला कॉंग्रेससोबतच तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष या अन्य विरोधी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. विधी आयोगाने या प्रस्तावावर मागील वर्षी चाचपणी केली असता या पक्षांनी आपला विरोध व्यक्त करताना एकत्रित निवडणुका ही संकल्पना भारतीय संघराज्य भावनेच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. 

संसदेतील रणनीतीबाबत यूपीएतील घटक पक्ष आणि अन्य विरोधी पक्षांची बैठक आज सायंकाळी झाली. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तसेच गुलाम नबी आझाद, अधीर रंजन चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुख अब्दुल्ला, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, द्रमुकचे टी. आर. बालू आणि कनिमोझी, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे एन. के. प्रेमचंद्रन, मुस्लिम लीगचे कुन्हालीकुट्टी, केरळ कॉंग्रेस मणीचे थॉमस चेझीकदन, व्हीसीके पक्षाचे थिरुमावलन यांनी संसदेतील रणनीतीवर चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT