Police Sakal
देश

पोलिसांचे वर्तन असंवेदनशील, प्रतिमा बनतेय नकारात्मक; संसदीय समितीचे ताशेरे

संसदीय समितीचे ताशेरे; योग्य प्रशिक्षणाची गरज व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : संपूर्ण देशात पोलिसांची प्रति मा नकारात्मक बनली असून सामान्य जनतेप्रती पोलिसांची वर्तणूक अनेकदा असंवेदनशील असल्याचे ताशेरे संसदीय समितीने ओढले आहेत. आयपीएस अधिकाऱ्यांविरोधातही भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करावे लागल्याबाबत समितीने चिंता व्यक्त केली आहे.

गृह खात्यासंबंधीच्या संसदीय स्थायी समितीने हा अहवाल तयार केला असून काँग्रेस नेते आनंद शर्मा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. जनतेच्या मनांत पोलिसांबाबतची प्रतिमा नकारात्मक होत असल्याचे या समितीने संसदेत सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. सामान्य जनतेशी पोलिसांची वागणूक असंवेदनशील होत असून गंभीर गुन्ह्याबाबतही ते गांभीर्याने पहात नाहीत, असा संताप अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या अशा वर्तणुकीमागे अनेक कारणे असू शकतात, असे समितीने कबूल केले असले तरी, पोलिसांची वर्तणुक सुधारण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी त्यांचा ‘हक्का’वर आधारित दृष्टीकोन बदलून तो अधिकारांवर आधारित केल्यास बराच सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्‍वास संसदीय समितीने व्यक्त केला आहे. प्रशिक्षण संस्थांनीही ही बाब ध्यानात ठेवत त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सुधारणा करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

कामगिरीचे मूल्यांकन करा

अनेक आयपीएस अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी दाखल केल्या जात असल्याबद्दल संसदीय समितीने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळेच, जिथे आयपीएस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होते त्या हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीला समितीने एक सल्ला दिला आहे. अकादमीमधील प्रशिक्षण संपवून प्रत्यक्ष काम करण्याचा प्रशिक्षणकाळ सुरु झाल्यावर अकादमीने या कालावधीत त्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कामाचे मूल्यमापन करावे, असे समितीने सुचविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT