goa
goa 
देश

मडगावमधील उत्सवांना गालबोट न लागण्यासाठी खबरदारी

सकाळवृत्तसेवा

मडगाव : ईद जुलूससाठी रोषणाई करणाऱ्या किरण नाईक युवकास झालेल्या मारहाणीमुळे घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे दोन गटात झालेल्या वादाचे पडसाद रुमडामळ दवर्ली हाऊसिंग बोर्ड येथे उमटले. मंगळवारी रात्री दवर्ली हाऊसिंग बोर्ड झेंडे लावण्यावरून दोन गटात वाद झाला. यावेळी काही युवकांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप एका गटाने केला आहे. 

घोगळ येथे रविवारी मध्यरात्री जुलूससाठी मुस्लीम मित्रांसोबत रोषणाई करणाऱ्या किरण नाईक व तिघां युवकांना मारहाण झाली होती. या मारहाणीस प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटाने घोगळ हाऊसिंग बोर्ड येथे तोडफोड केली. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी दोन्ही गटांतील नऊ जणांना अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

मंगळवारी रात्री वाहनाने आलेल्या चार युवकांनी एका घरावर झेंडे लावण्याचा प्रयत्न केला. घरातील लोकांनी त्यांना प्रतिबंध केला असता त्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या असा आरोप रुमडामळ दवर्लीचे पंच विनायक वळवईकर यांनी केला आहे. या युवकांनी एका वाहनाला ठोकर दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता हे अपघाताचे प्रकरण होते, असे पोलिसांनी स्पष्ट केले. देशविरोधी घोषणा दिल्याची तक्रार कोणीही पोलिसांत नोंदवलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. 

घोगळ येथील घटनेनंतर निर्माण झालेला तणाव निवळत असताना रुमडामळ दवर्ली हाऊसिंग बोर्डमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या वादामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. 

मडगावचा प्रसिद्ध दिंडी उत्सव, ईद ए मिलाद व नावेलीचे फेस्त असे तीन उत्सव आज एकत्रित साजरे करण्यात येत असून या उत्सवांना गालबोट लागू नये याची खबरदारी जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून घेण्यात येत आहे. उत्सवातील गर्दी व कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची ज्यादा कुमक मागवण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बटालीयनचे (आयआरबी) जवान मडगाव परिसराती तैनात करण्यात आले असून घोगळ, रुमडामळ दवर्ली, मडगाव व नावेली परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT