Sunita Narayan sakal
देश

Sunita Narayan : धोरणे चांगली पण अंमलबजावणीचा अभाव

‘मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी व हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना आखण्यासाठी सरकार सकारात्मक होते.

पीटीआय

नवी दिल्ली - ‘मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी व हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना आखण्यासाठी सरकार सकारात्मक होते मात्र, या धोरणांची अंमलबजावणी करण्यावर सरकारचा भर नव्हता,’ असे मत पर्यावरणवादी कार्यकर्त्या व सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटच्या (सीएसई) संचालक सुनीता नारायण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले.

‘आतापर्यंत झालेल्या बहुतांश सरकारांनी पर्यावरणविषयक परवानगी देण्याबाबतच्या प्रक्रियेतील नियम इतके शिथिल केले आहेत की आता ही प्रक्रिया कुचकामी झाली आहे,’ अशी खंत सुनीता नारायण यांनी व्यक्त केली. सरकारी धोरणांबद्दल बोलताना नारायण म्हणाल्या की, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी अनेक बाबतीत पुढाकार घेतला.

नवीन संकल्पना राबवायला हव्यात

‘सरकारच्या पर्यावरण विषयक योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन संकल्पना राबवायला हव्यात. उदाहरणार्थ, आपण नद्यांचे स्वच्छ पाणी वापरतो आणि खराब झालेले पाणी नद्यांमध्ये सोडून देतो. आपण आपल्या नद्याही स्वच्छ करू शकत नाही. अशा अनेक प्रकल्पांबाबत नव्या संकल्पना राबविण्याची आवश्‍यकता आहे,’ असे प्रतिपादन नारायण यांनी केले. सरकारने लोकांचे ऐकणे बंद केले आहे. सरकारने मोकळेपणाने लोकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

प्रत्येकवेळी विरोधासाठी विरोध नसतो

एखाद्या प्रकल्पाला जर कोणी विरोध केला, तर संबंधित व्यक्ती या प्रत्येक वेळी कोणाकडून तरी पैसे घेऊन विरोध करत आहेत, असे समजून त्यांच्यावर अविश्‍वास दाखविण्याची गरज नाही. कित्येकवेळा या बदलाचा परिणाम त्यांच्यावरही होणार असतो त्यामुळे विरोध केला जातो. त्यामुळे त्यांची मते समजून घेऊन त्यावर तोडगा काढायला संस्थात्मक पातळीवर यंत्रणा हवी, असे सुनीता नारायण म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : तिघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा खात्मा, पिंपरखेडमध्ये शार्पशूटरने झाडल्या गोळ्या

Pune Weather : पुणे गारठणार! पुढील 3-4 दिवसांत तापमानात मोठी घट; हवामान विभागाचा अंदाज

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

SCROLL FOR NEXT