Kashmir  sakal
देश

Kashmir : काश्‍मीरला जाण्यासाठी रस्ते वाहतुकीला पसंती;हवाई दरात वाढ झाल्याचा परिणाम

विमान भाड्यातील वाढ ही काश्‍मीरमधील पर्यटनात अडथळा ठरत आहे. यामुळे पर्यटक हवाई प्रवास टाळून रस्ते मार्गाने येण्यास पसंती देत आहे. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत १५.६५ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. यामध्ये २६ हजार परदेशी पर्यटक आहेत.

जावेद मात्झी -सकाळ न्यूज नेटवर्क

श्रीनगर : विमान भाड्यातील वाढ ही काश्‍मीरमधील पर्यटनात अडथळा ठरत आहे. यामुळे पर्यटक हवाई प्रवास टाळून रस्ते मार्गाने येण्यास पसंती देत आहे. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत १५.६५ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. यामध्ये २६ हजार परदेशी पर्यटक आहेत.

हिमाच्छादित डोंगर, आरस्पानी नद्या आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी काश्‍मीरला येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. यामुळे देशातील विविध ठिकाणांहून काश्मीरपर्यंतचे विमानाचे भाडे गगनाला भिडले असल्याने विमानप्रवासासह काश्मीरची सहल आवाक्याबाहेर आहे. अनेकांनी रस्ते मार्गाचा पर्याय अनेकजण निवडत आहेत, असे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. विमानाच्या भाडेवाढीबरोबरच रस्त्यांची स्थितीही सुधारली असल्याने काश्‍मीरचे पर्यटक ‘रोड ट्रीप’चा आनंद घेतात, असे त्याने सांगितले.

पर्यटक कंपन्या आणि व्यावसायिकांकडेही मोटारी आणि बस प्रवासासाठी विचारणा होत आहे. ‘‘काश्‍मीरसाठी येण्यासाठी वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे संबंधित व्यावसायिकाने सांगितले. श्रीनगर-जम्मू रेल्वेसेवा सुरू झाल्यामुळे रस्ते मार्गाने येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यावसायिकांना वाटत आहे.

‘‘काश्‍मीरच्या सहलीसाठी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडण्याचा कल वाढू लागला आहे. जम्मू ते श्रीनगर प्रवासासाठी वाहने आणि मोटारसायकली भाडेतत्त्वावर घेणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे,’’ असे पर्यटन व्यावसायिक कुथू यांनी सांगितले. काश्‍मीरमध्ये रस्त्यांवरून फिरण्याची मजा पर्यटक घेत आहे. हा पर्याय त्यांना किफायतशीर वाटतो आणि भारताचे नंदनवन पाहण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे.

या वर्षी विमानाचे तिकीट दर जास्त असल्याने आम्ही वाहनाने काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला. पैशाचा विचार करता विमानापेक्षा रस्ते वाहतूक परवडणारी तर आहेच शिवाय साहसीही आहे. यामुळे मार्गावरील सुंदर ग्रामीण भागही पाहता आला.

- प्रिया सिंग, पर्यटक, पंजाब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT