Kashmir Election sakal
देश

Kashmir Election : काश्मीरमध्ये निवडणुकीची तयारी;ऑगस्टमध्ये कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

गेल्या काही महिन्यांत दहशतवाद्यांच्या वाढत्या हल्ल्यांना न जुमानता केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या ३० सप्टेंबरपूर्वी बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणूक घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांत दहशतवाद्यांच्या वाढत्या हल्ल्यांना न जुमानता केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या ३० सप्टेंबरपूर्वी बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणूक घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून राज्यात तीन ते चार टप्प्यांमधील निवडणूक कार्यक्रमाची ऑगस्टच्या पूर्वार्धात घोषणा होण्याची शक्यता आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपूर्वी विधानसभा निवडणूक पार पाडावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. नरेंद्र मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी कलम ३७० संपुष्टात आणून जम्मू आणि काश्मीरचे विभाजन केल्यानंतर आता राज्यात प्रथमच निवडणूक होणार आहे. जम्मू आणि काश्मीर विधानसभा २१ नोव्हेंबर २०१८ रोजी विसर्जित करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणूक टाळली जावी म्हणून पाकिस्तान पुरस्कृत घुसखोरांनी गेल्या महिन्याभरात दहशतवादी हल्ले वाढविले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तिसऱ्यांदा ‘रालोआ’चे सरकार आल्यानंतर गेल्या ३८ दिवसांत जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या नऊ दहशतवादी हल्ल्यांमध्ये १२ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले असून १३ जवान जखमी झाले. या हल्ल्यांमध्ये दहा नागरिक मृत्युमुखी पडले असून पन्नासहून अधिक नागरिक जखमी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT