president ram Nath kovind esakal
देश

PM मोदी आंबेडकरांचे खरे अनुयायी; रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

कायद्यावर स्वाक्षरी करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य

सकाळ डिजिटल टीम

देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ते 'आंबेडकर आणि मोदी: रिफॉर्मर्स आयडियाज परफॉर्मर्स इम्प्लीमेंटेशन' या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात बोलताना पीएम मोदी हे भीमराव आंबेडकरांचे खरे अनुयायी असल्याचे म्हटले आहे. यासोबतच माजी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारने शिक्षण, कामगार कल्याण, महिला सक्षमीकरण आणि देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली.

भाषणात माजी राष्ट्रपती म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवावा, हे डॉ.आंबेडकरांचे स्वप्न होते. आणि मोदींनी तो निर्णय घेतल्याचे कोविंद म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याचा संदर्भ देत म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भीमराव आंबेडकरांचे खरे अनुयायी असून समाजसुधारकांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचे काम ते करत आहेत.

विशेष दर्जाचा प्रस्ताव बाबासाहेबांनी फेटाळला होता

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, "संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने बाबासाहेबांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव नाकारला होता. पुढे गुंतागुंतीच्या घडामोडी घडत असताना जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला, जो बाबासाहेबांच्या इच्छेविरुद्ध होता". ऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारच्या प्रयत्नांनंतर जम्मू-काश्मीरच्या संदर्भात ही विषमता दूर झाली आहे. कोविंद म्हणाले, भारताचे राष्ट्रपती म्हणून मला त्या कायद्यावर स्वाक्षरी करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT