राष्ट्रपती रामनाथ कोविंद  sakal
देश

राष्ट्रपती दौरा: मंडणगडातील पाच मुख्य मार्गावरील वाहतूक बंद

उद्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारे राष्ट्रपतींच्या दौऱ्यामध्ये अडथळा येणार नाही

सचिन माळी.

मंडणगड : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ गाव असणाऱ्या आंबडवे येथे अभिवादन करण्यासाठी येत असल्याने ता. 12 फेब्रुवारी रोजी मंडणगड तालुक्यातील पाच प्रमुख मार्गावरील वाहतूक ता.12 फेब्रुवारी रोजी पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याचे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महामहिम राष्ट्रपती सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मंडणगडमध्ये दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ता. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये पुढील मार्गावरील वाहतूक 9 तास बंद करण्यात येणार आहे.

म्हाप्रळ चेक पोस्ट कडून शेनाळे मार्गे मंडणगड शहरांमध्ये प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहतूक शेनाळे फाटा पासून बंद राहील. खेड दापोलीकडून मंडणगड शहरांमध्ये दापोली फाटा मार्गे प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहतूक कुंबळे फाट्यापर्यंत बंद राहील. बाणकोटकडून पाचरळ फाटा मार्गे मंडणगड शहराकडे येणारी वाहतूक पाचरळ फाटा पर्यंत पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. बाणकोट कडून पाचरळ फाटा म्हाप्रल शेनाळेफाटा मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. म्हाप्रळकडून पेवे पंदेरी मार्गे बाणकोटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. अशा प्रकारे पाच प्रमुख मार्गावरील वाहतूक 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कालावधीमध्ये बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मार्गावरील प्रवास करणार्‍या नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल.

म्हाप्रळकडून खेड दापोली बाणकोटकडे जाणारी वाहतुक शेनाळे फाटा येथून कुंबळे मार्गे जाईल. खेड दापोली कडून महाडकडे जाणारी वाहतुक कुंबळे शेनाळे फाटा मार्गे वळविण्यात येत आहे. बाणकोटकडून मंडणगड मार्गे महाड कडे जाणारी वाहतुक देव्हारे, दापोली, कुंबळे शेनाळे फाटा मार्गे जाईल. म्हाप्रळ कडून बाणकोट कडे मंडणगड मार्गे जाणारी वाहतूक शेनाले फाटा, कुंबळे दापोली देव्हारे मार्गे बाणकोटकडे जाईल. अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आत्तापर्यंत राष्ट्रपतींच्या येण्याच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुका वासियानी चांगल्या प्रकारे सहकार्य केले असून उद्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारे राष्ट्रपतींच्या दौऱ्यामध्ये अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन हा दौरा यशस्वी करण्यासाठी तालुकावासिय यांनी आपले योगदान देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT