Arvind Kejriwal
Arvind Kejriwal esakal
देश

ममतांनी बोलावलेल्या बैठकीला केजरीवाल उपस्थित राहणार? 'आप'ची भूमिका गुलदस्त्यात

सकाळ डिजिटल टीम

ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या संयुक्त बैठकीसाठी 22 नेत्यांना पत्र लिहिण्यात आलंय.

नवी दिल्ली : आज बुधवार, 15 जून रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत उपस्थित राहण्याबाबत आम आदमी पक्षानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीय. राष्ट्रपती निवडणुकीसाठी (Presidential Election) पुढाकार घेत तृणमूल काँग्रेसनं (Mamata Banerjee) आज सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावलीय. या बैठकीच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेस विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) बैठकीला जायचं की नाही याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीय.

दरम्यान, आगामी राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतरच 'आप' या मुद्द्यावर विचार करेल, असंही सूत्रांकडून सांगितलं जातंय. देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची (Presidential Election) चर्चा सुरू झालीय. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर केलीय. त्यानुसार 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतिपदावर कोणता उमेदवार असावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बैठका सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे राष्ट्रपती व्हावे, अशीही चर्चा रंगलीय.

निवडणूक आयोगानं (Election Commission) देशाच्या 16 व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची घोषणा केलीय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज 15 जून रोजी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबतच्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या संयुक्त बैठकीसाठी 22 नेत्यांना पत्र लिहिलंय. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा समावेश आहे.

याशिवाय RJD प्रमुख लालू प्रसाद यादव, सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा, सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. अध्यक्ष फारुक अब्दुलाह, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल, सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे अध्यक्ष पवन चामलिंग आणि आययूएमएलचे अध्यक्ष केएम कादिर मोहिद्दीन उपस्थित राहणार असल्याचं कळतंय.

आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्ष अशा चेहऱ्याच्या शोधात आहे, ज्यावर सर्व विरोधी पक्षांचं एकमत होईल. यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे सर्वात योग्य मानले जात होते. मात्र, त्यांना संयुक्त विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यात रस नाहीय. परंतु, पवारांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर डाव्या नेत्यांनीही पवारांची भेट घेतलीय. आज बुधवारी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या आवाहनानुसार, संभाव्य उमेदवारावर चर्चा करण्यासाठी विरोधकांची बैठक होणार असून, त्यात सर्व पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. इकडं पवारांनी नकार दिल्यानंतर विरोधक आता इतर नेत्यांच्या नावाचाही विचार करत आहेत. संभाव्य पर्याय म्हणून काही नेत्यांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी (Gopalkrishna Gandhi) यांच्याशीही संपर्क साधल्याचं कळतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT