farukh 
देश

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून फारुख अब्दुल्लांचीही माघार

जम्मू-काश्मीरच्या राजकारणात अद्याप काम करायचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात सध्या राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा असून विरोधकांकडून मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी सक्षम उमेदवाराची शोधाशोध सुरु आहे. यामध्ये सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच नाव आघाडीवर होतं. पण आपल्याला अद्याप सक्रीय राजकारण करायचं असल्याचं सांगत त्यांनी माघार घेतली. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही आपल्याला सक्रीय राजकारण करायचं कारण सांगत माघार घेतली आहे. (Presidential Election Farooq Abdullah Withdraws From Presidential Race)

आपली उमेदवारी मागे घेताना अब्दुल्ला यांनी म्हटलं की, जम्मू-काश्मीर सध्या महत्वाच्या काळातून प्रवास करत आहे. या अनिश्चित काळाला दिशा देण्यासाठी जम्मू-काश्मीरला माझ्या मदतीची गरज आहे. माझ्यासाठी यापुढील काळात मोठं सक्रीय राजकारण खुलं आहे.

जम्मू-काश्मीर आणि देशाची सेवा करण्यात सकारात्मक योगदान देण्यासाठी मी सज्ज असून माझं नाव राष्ट्रपतीपदासाठी सुचवल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मी आभारी आहे, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT