Presidential Election esakal
देश

मायावतींनंतर JDS चे कुमारस्वामी देणार भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा!

सकाळ डिजिटल टीम

देशातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली असून उमेदवाराच्या पाठिंब्यासाठी फोनाफोनी सुरुय.

देशातील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली असून उमेदवाराच्या पाठिंब्यासाठी फोनाफोनी सुरुय. मात्र, अशातच कुमारस्वामी यांनी वेगळा निर्णय घेण्याची तयारी दर्शविल्यानं विरोधी पक्षांना मोठा धक्का बसलाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत (Presidential Election) संयुक्त भूमिका ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत चर्चा झाली. या बैठकीला उपस्थित असलेल्या जनता दलनं (सेक्युलर) सत्ताधारी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचे संकेत दिलेत.

मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास त्याकडं ‘भाजपाला पाठिंबा’ म्हणून पाहिलं जाऊ नये हे अधोरेखित करताना, जेडी (एस) नेते आणि कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) म्हणाले की, द्रौपदी मुर्मू यांना आधीच पुरेसा पाठिंबा आहे आणि त्यांना आमच्या समर्थनाची गरज नाही. परंतु, तरीही त्यांनी आमच्या समर्थनाची मागणी केलीय आणि हे त्यांच्या चांगुलपणाचं लक्षण आहे.

कुमारस्वामी पुढं म्हणाले, मुर्मू यांनी माजी पंतप्रधान आणि जेडीएस (JDS) सुप्रीमो एच.डी देवेगौडा (HD Deve Gowda) यांना पाठिंबा देण्याची विनंती करण्यासाठी दोनवेळा फोन केला होता. त्यांनी वैयक्तिकरित्या बंगळुरूला येण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांना इथं येण्याची आवश्यकता नाहीय. माझ्या मते मुर्मू यांनी आधीच ही निवडणूक जिंकलीय. जनता दल सेक्युलरचे संसदेत 2 खासदार आहेत. राज्यसभेत देवेगौडा आणि लोकसभेत त्यांचा नातू प्रज्वल रेवन्ना. तसेच कर्नाटक विधानसभेत त्यांचे 30 आमदार आहेत. हे आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. मात्र, जेडीएसच्या या निर्णयावर काँग्रेसनं (Congress) टीका करण्यास सुरुवात केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT