presidential elections presidential candidate Mukhtar Abbas Naqvi statement Voting July 18 and counting votes July 21 narendra modi amit shah
presidential elections presidential candidate Mukhtar Abbas Naqvi statement Voting July 18 and counting votes July 21 narendra modi amit shah sakal
देश

राष्ट्रपतीपद उमेदवारी : मुख्तार अब्बास नकवी म्हणतात, सितारों के आगे जहाँ और भी है !

मंगेश वैशंपायन -सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - सत्तारूढ भारतीय जनता पक्षातील, टीम मोदीमधील सध्याचा एकमेव मुसलमान चेहरा असलेले केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा अनुकूल असल्याची चर्चा जोरात आहे. स्वतः नक्वी यांनी प्रथमच यावर भाष्य करताना, ‘‘सितारों के आगे जहां और भी है,, अभी इश्क के इम्तेहान और भी हैं," अशी काव्यात्मक प्रतीक्रिया दिली व मी फार आशावादी माणूस आहे असेही सूचकपणे सांगितले. १८ जुलै रोजी मतदान व २१ जुलै रोजी मतमोजणी होणाऱया राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी राज्यसभा सचिवालयातून १० जणांनी अर्ज नेल्याचे समजते.

१० आॅगस्टपूर्वी उपराष्ट्रपतीपदाचीही निवडणूक होणे आवश्यक आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र अनेक भाजपेतर पक्षांची साथ त्यांना मिळू शकत नसल्याचे दिसते. संख्याबळ भाजप आघाडीच्या बाजूने असल्याचे सत्तारूढ नेत्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदी हेच भाजपचा उमेदवार ठरविणार आहेत व ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. नुपूर शर्मा प्रकरणामुळे आखाती देशांनी रोष व्यक्त करताच सारा देशच बचावाच्या पवित्र्यात उबा राहिल्याचे चित्र जागतिक पातळीवर उभे राहिले. त्यावर उतारा म्हणून दोनपैकी किमान एका सर्वोच्च पदासाठी मोदी मुस्लिम उमेदवाराचे नाव देऊ शकतात अशी चर्चा आहे.

ती खरी ठरली तर भाजपकडे त्यासाठी नक्वी हे सर्वोच्चम पर्याय आहेत. नुपूर प्रकरणी त्यांनी जी आघाडी सांभाळली त्यामुळे भाजप नेतृत्व ‘प्रसन्न' झाल्याचे सांगितले जाते. मात्र नक्वी यांची सक्रियता पाहता त्यांना राज्यसभेची जबाबदारी असणारे उपराष्ट्रपतीपद दिले जाईल असेही जाणकार मानतात. स्वतः नक्वी यावर अद्याप बोलण्याचे टाळत होते. मात्र एका वृत्तवाहिनीच्या प्रश्नावर त्यांनी काल याबाबतचे मौन सोडले. ‘आपण फार आशावादी आहोत', असे स्पष्ट करताना त्यांनी सितारों के आगे, हा शेर उधृत केला. ते म्हणाले की राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपद या दोन्ही फार वेगळ्या जबाबदाऱया आहेत. त्यासाठी भाजप नेतृत्व योग्य वेळी उमेदवार जाहीर करेल. मी सध्या त्यात नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या व मोदी यांच्या काळातही सरकारमध्ये सक्रिय असणारा अखेरचा दुवा म्हणजे नक्वी आहेत. मात्र याच नक्वींना भाजपने राज्यसभेचे व नंतर लोकसभा पोटनिवडणुकीचेही तिकीट दिले नाही. तरीही त्यांच्या चेहऱयावरील हास्य जाणकारांना सूचक वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT