Panch Agnee Tapasya 
देश

Panch Agnee Tapasya: तापमान वाढ रोखण्यासाठी केली 'कडक तपश्चर्या'; साधुचा उष्माघातानं मृत्यू!

संबंधित साधूंनी तपस्येसाठी प्रशासनाची परवानगी घेतली होती. त्यानंतर त्यांनी २३ मे रोजी आपली तपस्या सुरु केली, सोमवारी ही तपस्या संपणार होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बरेली : पर्यावरण बदलाचे मानवावर होणारे परिणाम कमी व्हावेत तसेच जागतीक शांतता, कल्याण अन् ड्रग्ज मुक्तीसाठी उपोषण आणि 'पंचअग्नी तपस्या' करणाऱ्या एका ७२ वर्षीय साधूचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली इथं ही घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Priest on Panch Agnee Tapasya for climate change dies of heat stroke)

मृत्यू पावलेल्या साधूचा शिष्य राजेंद्र प्रसाद तिवारी यांनी सांगितलं की, "बाबांचा हीट स्ट्रोकनं मृत्यू झाला आहे. जागतीक तापमानवाढीबद्दल त्यांना चिंता वाटत होती. पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळं ते अस्वस्थ होते. यापासून मानवजातीचं कल्याण व्हावं यासाठी ते तपस्या करत होते. पण हे सांगायला वाईट वायतंय की त्याच पर्यावरणानं त्यांचा जीव घेतला"

संभलचे एसडीएम विनय कुमार मिश्रा म्हणाले, "संबंधित साधूंनी तपस्येसाठी प्रशासनाची परवानगी घेतली होती. त्यानंतर त्यांनी २३ मे रोजी आपली तपस्या सुरु केली, सोमवारी ही तपस्या संपणार होती. पण ते भोवळ येऊन पडले आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं" तसेच इमर्जन्सी विभागाचे मेडिकल ऑफिसर डॉ. विश्वनाथ म्हणाले, "साधूंना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांचं आधीच निधन झालं होतं. आगीनं वेढलेल्या वर्तुळात बसून ते तपस्या करत असल्यानं उष्माघातानं त्यांचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे"

दरम्यान, कमलीवाले पागल बाबा नावानं हे साधू ओळखले जात होते, अमेठीचे ते रहिवासी होते. गेल्या २५ वर्षात देशातील विविध भागात त्यांनी अशा प्रकारे २३ वेळा तपस्या केल्या आहेत. बेनिपूर इथल्या आश्रमात ते सध्या राहत होते. आत्ता जेव्हा ते तपस्येला बसले ते एका शेतात. इथं त्यांच्या आजुबाजुला खूपच कमी झाडं होती. संभलमधील कमाल तापमान हे ४३ डिग्री सेल्सिअस होतं.

या काळात सरकारनं जनतेसाठी इशारा दिला होता की, त्यांनी घरातच रहावं दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये. मग असं असताना त्यांना पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना तपस्या करायला परवानगीच कशी दिली गेली, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. तसंच जेव्हा साधूंना त्रास झाला तेव्हा तिथं घटनास्थळी अॅम्ब्युलन्स यायला अर्धा तास लागला.

पंचअग्नी तपस्या हा प्राचिन हिंदू परंपरेतील एक प्रकार आहे. याचा उल्लेख पद्मपुराण, शिवपुराण या पुराणांमध्येही आहे. आपल्या चारही बाजूनं अग्निपेटवून मध्यभागी बसून यामध्ये तपस्य केली जाते, असं सांगितलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT