Employment
Employment esakal
देश

‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती प्रकल्पा’मध्ये रोजगार निर्मितीचे प्रमाण घटले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्राच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती प्रकल्पा’मध्ये २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षांच्या काळात रोजगाराचे प्रमाण घटले आहे. कोरोनातील टाळेबंदीच्या काळात देशभरातील ७४ हजारांहून अधिक जण या योजनेकडे वळाले असले तरी महाराष्ट्रामध्ये आणि पंतप्रधान मोदींचे गृहराज्य गुजरातमध्येही या योजनेतील रोजगार कमी झाला आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयातर्फे स्वयंरोजगारासाठी खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती प्रकल्प’ राबविला जातो. यात बिगरशेती स्वयंरोजगारासाठी लहान व्यवसाय (मायक्रोयुनिट) सुरू करण्याची मदत केली जाते.

मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीनुसार २०१८-१९ मध्ये या योजनेतर्गत ७३,४२७ लहान व्यवसाय सुरू झाले आणि पाच लाख ८७ हजार ४१६ जणांना रोजगार मिळाले. मात्र, त्याच्या पुढील वर्षी (२०१९-२०) या लहान व्यवसायांच्या संख्येत ६,७७४ ने घट होऊन ६६,६५३ व्यवसाय सुरू झाले.

गुजरात, महाराष्ट्रातही घट

महाराष्ट्रात २०१८-१९ मध्ये ४५,१३६ रोजगार देण्यात आले होते. १९-२० मध्ये ९,८८८, तर २०-२१ मध्ये त्यात आणखी १०,४१६ ने घट झाली. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये २०१८-१९ मध्ये २८,००० जणांना रोजगार मिळाले. पुढच्या वर्षात त्यात ३१,८६४ (३८६४ ने) वाढ झाली. परंतु कोरोनाच्या टाळेबंदी काळात ९,०३२ ने घट झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT