PM Narendra Modi Bangalore Special Court esakal
देश

PM Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढल्या; विशेष न्यायालयात पंतप्रधानांविरोधात खासगी तक्रार दाखल

समाजात द्वेष पसरवल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.

सकाळ डिजिटल टीम

हेब्बाळ येथील रहिवासी झियाउर रहमान नोमानी यांनी बंगळूरच्या ४२ व्या अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयात ही खासगी तक्रार दाखल केली आहे.

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात बंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष दंडाधिकारी न्यायालयात (Special Court) एक खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधानानी मुस्लिमांना घुसखोर संबोधले आणि काँग्रेस (Congress) सत्तेवर आल्यास ते देशातील मुस्लिमांना (Muslim Community) संपत्तीचे पुनर्वितरण करतील, असे द्वेषयुक्त भाषण केल्याचा आरोप या तक्रारीत आहे.

हेब्बाळ येथील रहिवासी झियाउर रहमान नोमानी यांनी बंगळूरच्या ४२ व्या अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयात ही खासगी तक्रार दाखल केली आहे. त्यात समाजात द्वेष पसरवल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.

प्रचाराच्या भाषणादरम्यान समाज आणि धर्म यांच्यात द्वेष निर्माण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आणि गुन्हेगारी भडकावणे यासाठी आयपीसी कलम १५३ ए, १५३ बी, २९५ ए, ५०३, ५०४, ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल करण्याचे अमृतहळ्ळी पोलिसांना (Amruthahalli Police) निर्देश द्यावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT