Priyanka Gandhi  eSakal
देश

'माझ्या मुलांचे इंस्टाग्राम देखील हॅक झाले'; प्रियंका गांधींचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

समाजवादी पक्षाचे (SP) नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी यूपीमध्ये योगी आदित्यनाथ सरकारवर (Yogi Adityanath Government) फोन टॅपिंगचे (Phone Tapping) आरोप केल्यानंतर, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देखील त्यांच्या मुलांचे इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट हॅक करण्यात आल्याचा आरोप केला.

सध्या विरोधी पक्षाकडून यूपी सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप केले जात आहेत. काँग्रेसच्या वतीने प्रियंका गांधी म्हणाल्या की, त्यांच्या मुलांचे इन्स्टाग्राम देखील हॅक केले जात आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, यूपीच्या जनतेने ज्या अपेक्षा बाळगत सत्ता सोपवली होती, ती पूर्ण करण्यात योगी सरकार अपयशी ठरले आहे. तुम्ही सरकारला प्रश्न विचारू शकत नाही. काहीही विचारलं तर सरकार इतिहासाबद्दल बोलणे सुरु करते.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप लावले होते. आमचे सर्व फोन टॅप केले जात आहेत आणि आमचे संभाषण रेकॉर्ड केले जात आहे. पक्ष कार्यालयातील सर्व फोन ऐकले जात आहेत असा आरोप उत्तर प्रदेश सरकारवर केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अखिलेश यादव यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना कदाचित अखिलेश यांनी सत्तेत असताना असेच काही केले असावे. त्यामुळे आता ते इतरांवर आरोप करत आहेत असे म्हटले.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, युपीमध्ये महिला सजक झाल्या आहेत त्या त्यांचा हक्क मागत आहेत. आज पंतप्रधान महिलांसमोर नतमस्तक होत आहेत, त्या पुढे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतक्या घोषणा कराव्या लागल्या हा काँग्रेसच्या दबावाचा आणि दूरदृष्टीचा परिणाम आहे. महिलांच्या हक्कांसाठी काँग्रेसने खऱ्या अर्थाने लढा दिला आहे आणि भविष्यातही लढत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT