Priyanka Gandhi admitted to hospital 
देश

Priyanka Gandhi News : प्रियंका गांधींची तब्येत बिघडली! भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यापूर्वीच रुग्णालयात दाखल

Priyanka Gandhi admitted to hospital : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रोहित कणसे

Priyanka Gandhi vadra Admitted to Hospital : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी स्वतः एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. तसेच त्या प्रकृतीच्या कारणास्तव शुक्रवारी 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होऊ शकणार नाहीयेत. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्या आज संध्याकाळी उत्तर प्रदेशातील चंदौली येथे काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार होत्या. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रियंका गांधी यांनी लिहीलं की, 'मी 'भारत जोडो न्याय यात्रा' उत्तर प्रदेशात पोहोचण्याची आतुरतेने वाट पाहत होते, पण आजारपणामुळे मला आजच रुग्णालयात दाखल करावे लागले. माझी तब्येत थोडी सुधारली की मी या यात्रेत सामील होईन. तोपर्यंत चंदौली-बनारसला पोहोचणाऱ्या सर्व यात्रेकरूना, प्रवासाची तयारी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील माझ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या प्रिय भावाला मी शुभेच्छा देते.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई अशी 'भारत जोडो न्याय यात्रा ' काढण्यात येत आहे. ही यात्रा सध्या बिहारमध्ये असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यात सहभागी झाले आहेत. आज ही यात्रा उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. 16 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत पूर्व उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांतून रायबरेली, अमेठी येथे ही यात्रा जाणार आहे. 22 आणि 23 फेब्रुवारीला विश्रांती घेतली जाईल. 24 आणि 25 फेब्रुवारीला पश्चिम उत्तर प्रदेशातून हा प्रवास पुन्हा सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT