Sputnik V Light  
देश

'स्पुटनिक लाईट' सिंगल डोस लसीचं लवकरच सुरु होणार उत्पादन

स्पुटनिक लाईटबाबतची चर्चा अंतिम टप्प्प्यात असल्याची रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : रशियाच्या स्पुटनिक लाईट सिंगल डोस कोरोना प्रतिबंधक लसीचं भारतात लवकरच उत्पादन सुरु होणार आहे. यासाठीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गी लॅव्हरोव यांनी नवी दिल्ली येथे दिली. रशियाचं राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचं शिष्टमंडळ सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

रशियाच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांसोबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लॅव्हरोव म्हणाले, स्पुटनिक लाईटच्या भारतातील उत्पादनाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. दोन डोसच्या स्पुटनिक व्ही या लसीच्या भारतातील उत्पादनाबाबतच्या कराराची सध्या अंमलबजावणी सुरु आहे. पण स्पुटनिक लाईटचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर व्हावं ही अपेक्षा आहे. यामध्ये प्रत्येक वर्षाला शंभर मिलियन डोस बनवणं अपेक्षित आहे.

सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर डीसीजीआयच्या तज्ज्ञांच्या समितीनं स्पुटनिक लाईटच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी दिली होती. या चाचण्यांना एकदा मंजुरी मिळाल्यानंतर भारतात पहिल्या सिंगल डोस स्पुटनिक लाईट डोसचा वापर सुरु होईल.

भारतात सध्या तीन लस वापरल्या जात आहेत. यामध्ये ब्रिटिश-स्विडीश कंपनी अॅस्ट्राझेनेका आणि भारताच्या सिरम इन्स्टिट्युटनं उत्पादित केलेली कोविशिल्ड, भारत बायोटेकनं बनवलेल्या स्वदेशी कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसींचा समावेश आहे. दरम्यान, अमेरिकेतील मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या दोन लसींना देखील भारतात आपत्कालिन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. पण अद्याप या लसींचे डोस भारतात सुरु करण्यात आलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकार देतंय तेच औषध लिहून दिलंय, पोलिसांनी डॉक्टरला अटकच कशी केली? IMAचा सवाल

Maharashtra TET 2025 : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २३ नोव्हेंबर रोजी होणार, अर्ज भरण्यास मुदतवाढ

Latest Marathi News Live Update : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच होणार घोषणा, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु

धक्कादायक घटना! 'आईने संपवली जीवनयात्रा'; त्रासाला कंटाळून उचल टाेकाचं पाऊल; मुलीची फिर्याद, नेमकं काय कारण?

J Dey case : पत्रकार जे. डे हत्याकांड: मुंबई उच्च न्यायालयाने ४ आरोपींचा जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT