Ludhiana Hospital esakal
देश

Ludhiana : जास्त दारू पिण्याच्या कारणावरून आप आमदाराच्या वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

जास्त दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला आणि आमदाराच्या वडिलांनी विषारी द्रव्य प्यायलं.

सकाळ डिजिटल टीम

जास्त दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला आणि आमदाराच्या वडिलांनी विषारी द्रव्य प्यायलं.

लुधियाना : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) आमदार लाभ सिंह उगोके (MLA Labh Singh Ugoke) यांच्या वडिलांनी आज (गुरुवार) आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना लुधियानातील रुग्णालयात (Ludhiana Hospital) दाखल करण्यात आलं आहे.

आमदार लाभ सिंह उगोके यांचे वडील दर्शन सिंह हे त्यांच्या उगोके गावात राहतात आणि आमदार लाभ सिंह यांचे भाऊ सुखचैन सिंह हे देखील त्यांच्याचसोबत राहतात. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी भाई सुखचैन सिंग यांच्यात जास्त दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर वडील दर्शन सिंह यांनी घरात ठेवलेलं विषारी द्रव्य प्यायलं. येथूनच कुटुंबीयांनी त्यांना लुधियाना येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं.

आपल्या मोठ्या मुलाच्या (लाभ सिंगचा मोठा भाऊ) ड्रग्सच्या सवयीमुळं ते त्रस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना लुधियाना डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी त्यांचं मोठ्या मुलासोबत जोरदार भांडण झालं. लाभ सिंह उगोके यांच्या वडिलांची डीएमसीतील प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

MLA Labh Singh Ugoke

लाभ सिंह उगोके हेही डीएमसीमध्ये पोहोचले आहेत. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत (Punjab Assembly Election) बर्नालाच्या राखीव भदौर मतदारसंघातून मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांचा पराभव करून उगोके प्रसिद्धीच्या झोतात आले. लाभसिंह उगोके यांनी सरकारी शाळेत शिक्षण घेण्यासोबतच सुमारे 15 वर्षे झाडू मारण्याचं काम केलं आहे. उगोके यांची आई बलदेव कौर या शाळेतच सफाई कामगार म्हणून कंत्राटी पद्धतीनं काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT