CM Bhagwant Mann 
देश

पंजाब : भ्रष्टाचाराचे आरोप होताच मंत्र्याची हाकालपट्टी; CM मान यांचा मोठा निर्णय

पंजाबच्या आरोग्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही धडाकेबाज कारवाई केली.

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : पंजाबचे आरोग्यमंत्री विजय सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांची तडकाफडकी मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. कंत्राटं देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून १ टक्का कमिशन मागितल्याचा मंत्री सिंगला यांच्यावर आरोप आहे. (Punjab CM Bhagwant Mann sacks Health Minister Vijay Singla due to complaints of corruption)

पंजाबमध्ये सध्या आम आदमी पक्षाचं सरकार आहे. या पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारविरोधी मॉडल म्हणूनच आपल्या पक्षाचा विस्तार केला आहे. त्यामुळेच पंजाबचे आरोग्य मंत्री सिंगला यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर आणि याचे ठोस पुरावे समोर आल्यानंतर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्य मंत्री सिंगला हे अधिकाऱ्यांकडून कंत्राट देण्यासाठी १ टक्के पैशाची मागणी करत होते. याची तक्रार मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मंत्री सिंगला यांची तात्काळ हाकालपट्टी केली. यामुळं देशाच्या इतिहासात दुसऱ्यांदा एका मुख्यमंत्र्यांन थेट आपल्या मंत्र्यावर कारवाई केली आहे. या कारवाईबाबत बोलताना CM मान म्हणाले, जनतेनं मोठ्या आशेनं आम आदमी पार्टीच्या सरकारला संधी दिली आहे. त्यामुळं त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणं आपलं कर्तव्य आहे. एक टक्का भ्रष्टाचारही सहन केला जाणार नाही. या आरोपानंतर संबंधित मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ताज्या माहितीनुसार आरोप मंत्री विजय सिंगला यांना अटकही करण्यात आली आहे.

मंत्री डॉ. संगला आहेत प्रसिद्ध दंत सर्जन

मान सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झालेले डॉ. विजय सिंगला हे प्रसिद्ध दंत सर्जन असून त्यांनी आपलं बीडीएसचं शिक्षण पटियाला येथील राजिंदरा मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं आहे. त्यांचे वडील एक छोट किराणा दुकान चालवायचे. दहा वर्षांपूर्वी डॉ. सिंगल यांनी आपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर यंदा त्यांना आपनं मानसा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिलं. डॉ. सिंगला यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांचा ६० हजार मतांनी पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasota Fort Tourism Development : वासोटा किल्ल्याचं रूप पालटलं! आता दरीच्या टोकावर उभं राहून फोटो काढणं होणार सोपं; गडावर वन विभागानं असं काय केलंय?

Mulank : 'या' 3 महिन्यात जन्मलेल्या लोकांचे 35 वयानंतर चमकते नशीब; असतात लक्ष्मी-कुबेरचे लाडके, पण त्याआधी करावा लागतो खूप संघर्ष

Latest Marathi News Live Update : कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवाल

Investment Planning: गुंतवणुकीत एक्झिट स्ट्रॅटेजी नसलेल्या गुंतवणूकदारांवर का येते पश्चात्तापाची वेळ?

Bus Accident Highway : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीत एसटी बसचा अपघात, २१ प्रवासी असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT