Charanjit Singh Channi esakal
देश

मुख्यमंत्र्यांनी एपीएस देओल यांचा राजीनामा फेटाळला

सकाळ डिजिटल टीम

एपीएस देओल यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला होता.

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी महाधिवक्तापदी असलेल्या एपीएस देओल (Punjab Advocate General APS Deol) यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्याचं समजतंय. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांच्यावरील टीकेनंतर देओल यांनी सोमवारी मुख्यमंत्री चन्नी यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केलं.

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिध्दू यांच्यावर निशाणा साधल्यानंतर, एपीएस देओल यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला होता. वास्तविक, एपीएस देओल हे पोलिस गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी पोलिसांचं प्रतिनिधित्व करत होते. अशा स्थितीत त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकारी नाही, देओल यांना पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी सिध्दूंनी सरकारकडे केली होती. पंजाबचे डीजीपी आणि अॅडव्होकेट जनरल बदलण्याची सिध्दूंकडून सातत्याने मागणी होत आहे.

वीज दरात कपात करण्याच्या घोषणेवरून सिध्दू यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी केली. सिध्दू यांनी राज्य सरकारवर सातत्याने केलेल्या टीकेमुळे सीएम चन्नी यांनी हे पाऊल उचलल्याचं समजतंय. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील एपीएस देओल यांची सप्टेंबरमध्ये महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या आधी अतुल नंदा यांची या पदावर नियुक्ती होती. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. देओल हे 2015 च्या पोलिस गोळीबार प्रकरणात माजी पोलिस महासंचालक सुमेध सिंग सैनी यांचे वकीलही होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

Kasaba Borgaon Drowning : चार बहिणीनंतर विकासचा जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झालेला विवाह; कासारी नदीत बुडून 32 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, पन्हाळ्यातील दुर्घटनेने हळहळ

Crime News: पत्नीचे ऐकत नाही म्हणून जावयाला मारहाण; तिघांवर गुन्हा

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT