Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu 
देश

सिद्धूंचा काँग्रेसवर लेटरबॉम्ब! सोनिया गांधींना चार पानी पत्र

सकाळ डिजिटल टीम

सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पत्र लिहिलं आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या महिन्याभरात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी राजीनामा दिला होता. आता त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेस पक्षश्रेष्ठी यशस्वी झाले असून राजीनामा मागेही घेतला आहे. दरम्यान, आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

सिद्धूंनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानांचे पत्र लिहिले आहे. यात त्यांनी १३ मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे. यापैकी १२ मुद्दे हे ड्रग्ज, कृषी, वीज, सरकार आणि वीज कंपन्या यांच्यातील करार रद्द करणं तसंच इतर काही गोष्टींमध्ये न्याय मिळावा यांचा समावेश आहे. मागासवर्गीयांचा विकास, रोजगार, सिंगल विंडो सिस्टिम, महिला आणि तरुणांचे सबलीकरण, दारु आणि अवैध खाणकाम याविरोधात कारवाई यावरही त्यांनी लक्ष वेधले आहे.

सिद्धू यांनी राजीनामा मागे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पत्र लिहिलं आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे प्रभारी हरीश रावत आणि पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली होती. तसंच आपल्या अडचणी त्यांनी पक्षासमोर मांडल्या होत्या. सिद्धू यांनी अशी मागणी केली आहे की, पक्षाने २००७ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी केलेल्या घोषणांची पूर्तता करायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT