sidhu moose wala was shot 
देश

गायक मुसेवाला हत्या प्रकरणाची होणार न्यायालयीन चौकशी? सरकारचं हायकोर्टाला पत्र

सरकार करणार हायकोर्टाला विनंती

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची न्यायालयीन चौकशी व्हावी यासाठी पंजाब सरकारनं हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांना विनंती केली आहे. सिद्धू मुसेवाला याच्या कारवर रविवारी काही अज्ञात लोकांनी अक्षरशः गोळ्यांचा वर्षाव केला होता. यानंतर पंजाबच्या भगवंत मान सरकारला मोठ्या टीकेला सामोर जावं लागत आहे. (Punjab govt requested to HC for judicial inquiry into murder of singer Siddhu Musewala)

पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयानं यासंदर्भात एक प्रेसनोट काढली असून यामध्ये म्हटलं की, मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या धक्कादायक घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून या हल्ल्याचा निषेधही केला आहे. सिद्धूच्या वडिलांच्या विनंतीनुसार, पंजाब सरकार पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाकडं विनंती करणार आहे की, याप्रकरणाची चौकशी विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी.

तसेच राज्य सरकार यासंदर्भात नेमण्यात येणाऱ्या चौकशी समितीला तसेच एनआयए सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा पूर्ण सहाकार्य करेल. त्याचबरोबर सरकारनं पंजाबच्या पोलीस महासंचालकांना निर्देश दिले की, काल त्यांनी मुसेवालाच्या हत्येसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेचं स्पष्टीकरण द्यावं.

सरकारनं आधीच या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची तसेच सुरक्षा कमी केल्याच्या मुद्द्याबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT