Won Lottery esakal
देश

Won Lottery : चाळीस वर्षे तिकिटं खरेदी केली... 88व्या वर्षी 5 कोटींची लॉटरी लागली

सकाळ डिजिटल टीम

88 year old man wins lottery five crores

पंजाबच्या मोहालीमधील डेरा बस्सीच्या जवळ त्रिवेदी कँपात राहणाऱ्या महंत द्वारका दास यांचं वय ८८ वर्षे आहे. त्यांनी तब्बल पाच कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. त्यामुळे त्यांचं कुटुंब आणि परिसरात आनंदाचं वातावरण आहे.

लॉटरीमध्ये मिळणारी रक्कम द्वारका दास कशा पद्धतीने खर्च करणार, याबद्दल त्यांनी माहिती दिलीय. द्वारका दास हे तब्बल ४० वर्षे सलग लॉटरीचं तिकीट खरेदी करत होते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचं नशीब उजळलं आहे.

हेही वाचाः मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

द्वारका दास हे गावातल्या एका मंदिरामध्ये महंत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी जीरकपूरमधून बंपर तिकीट खरेदी केलं होतं. त्यांची दोन्ही मुलं मुकेश आणि नरिंदर यांनी सांगितलं की, लॉटरीतून मिळालेल्या पैशांबाबत वडील जो निर्णय घेतील तो आम्हांला मंजूर असेल. सध्या आमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

लॉटरी लागल्यानंतर द्वारका दास यांनी सांगितलं की, मी या पैशांचे ती हिस्से करणार आहे. दोन वाट्यांमध्ये दोन्ही मुलं आणि एक वाटा मंदिरावर खर्च करणार आहे. मी पूर्ण आयुष्य कष्ट करुन कुटुंबाला सांभाळलं आहे, त्यामुळे मला या पैशांचं फारकाही अप्रूप नाही.

द्वारका दास यांनी पुढे सांगितलं की, परमेश्वराने सर्वांना करोडपती बनवावं. मी ३५-४० वर्षांपासून लॉटरी तिकीट खरेदी करत आलोय. परंतु आताकुठे नशीब उजळलं आहे. महंत दास यांचा मुलगा नरेंद्र कुमार हा ऑटो चालक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT