file photo
file photo
देश

भटक्या कुत्र्याने शोधून काढला मालकाचा शीर नसलेला मृतदेह

दीनानाथ परब

मोहाली: कुत्रा हा इमानी प्राणी आहे. कुत्रा नेहमी मालकाशी इमान राखतो. पंजाबमध्ये एका भटक्या कुत्र्याने मालकाचा शीर नसलेला मृतदेह शोधून काढला आहे. छोटी बडी नागल गावात राहणाऱ्या सुचा सिंग यांनी दोन वर्षांपूर्वी एका भटक्या कुत्र्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याला घरात आसरा दिला. त्याच भटक्या कुत्र्याने सुचा सिंग यांचा हत्येनंतर पुरलेला शीर नसलेला मृतदेह शोधून काढला. (Punjab Stray dog adopted by victim found his buried headless body)

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या मोहालीतील सिसवान येथील फार्महाऊस जवळ सुचा सिंह यांचे धड सापडले. सुचा सिंग यांना कुटुंबियांनी रविवारी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 'रॉकी' नावाच्या भटक्या कुत्र्याने सुचा सिंग यांचा मृतदेह पुरला होता, ती जागा दाखवली. सुचा सिंग यांचे शीर अद्याप सापडलेले नाही. त्यांची हत्या झाली आहे. या हत्या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

छोटी बडी नागल गावात मंगळवारी सुचा सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. "रॉकी रविवारपासून काही खातपीत नाहीय. आम्ही त्याला सोडलं, तर तो वडिलांचा मृतदेह जिथे सापडला त्या जागेवर जाऊन सारखा घुटमळतो" असे सुचा सिंग यांचा मुलगा संदीप सिंगने सांगितले.

"दोन वर्षांपूर्वी रॉकीची हालत खूप खराब होती. उपासमारीमुळे त्याच्यात त्राण नव्हते. त्यावेळी सुचा यांनी त्याची काळजी घ्यायला सुरुवात केली. त्याला खाऊपिऊ घातले. रॉकी आणि सुचा दोघांना एकमेकांचा असा लळा लागला की, सुचा कधी घरी येणार त्याची रॉकी वाट पाहायचा" असे भाग सिंह यांनी सांगितले. ते सुचा सिंग यांचे चुलत भाऊ आहेत. सुचा यांची हत्या करण्यापूर्वी त्यांनी मित्रांसोबत पार्टी केली. त्यावेळी रॉकी सुद्धा त्यांच्यासोबत होता. सुचा यांच्याशोधात कुटुंबीय आणि गावकरी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रॉकीच्या गळ्यातील पट्टा संदीपच्या हातात होता. त्याने संदीपकडून स्वत:ची सुटका करुन घेतली व धावत एकाठिकाणी जाऊन खोदकाम सुरु केले. रॉकी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. हे खोदकाम सुरु असताना तिथे सुचा यांचा शीर नसलेला मृतदेह आढळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT