Pushkar Singh Dhami Esakal
देश

मतदारसंघात पराभूत तरीही पुष्कर सिंह धामीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री

सकाळ डिजिटल टीम

डेहराडून: उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांचीच पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची घोषणा केली आहे. डेहराडूनमध्ये आमदारांच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. उत्तराखंडमध्ये 23 मार्च रोजी शपथग्रहणाचा कार्यक्रम होणार आहे. (Uttarakhand)

यावेळी बोलताना राजनाथ सिंग यांनी म्हटलंय की, पुष्कर सिंह धामी यांचीच विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड वेगाने प्रगती करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली तरी मुख्यमंत्री धामी यांचाच त्यांच्या मतदारसंघामध्ये पराभव झाला आहे. खटीमामधून त्यांचा पराभव झाला आहे. या साऱ्या परिस्थितीमध्ये आता नव्या सरकारचं नेतृत्व कोण करणार? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. त्यावर भाजपमधील वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरु होती. अनेक आमदारांनी धामी यांच्यासाठी आपली जागा रिकामी करण्याचाही प्रस्ताव दिला आहे. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर 10 मार्च रोजी निकाल घोषित करण्यात आला. भाजपने या निवडणुकीमध्ये 70 जागांपैकी 47 जागांवर विजय मिळवला असून सलग दुसऱ्यांदा सत्ता प्राप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT