Rafale Deal Documents have not been stolen says Government
Rafale Deal Documents have not been stolen says Government 
देश

'राफेल'ची कागदपत्रे चोरीला गेली नाहीत; सरकारचा 'यू-टर्न'

पीटीआय

नवी दिल्ली : "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारात विरोधकांच्या टीकेमुळे बॅकफूटवर गेलेल्या केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा "यू-टर्न' घेतला. राफेल विमानासंदर्भातील दस्तावेज संरक्षण मंत्रालयातून चोरीस गेलेले नसून, याचिकाकर्त्यांनी त्या मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढून आपल्या अर्जाला जोडल्या आहेत, असे आपल्याला सांगायचे होते. हे सगळे याचिकाकर्त्यांकडून चोरून करण्यात आले होते, असे ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी आज स्पष्ट केले. 

तत्पूर्वी केंद्र सरकारने संरक्षणमंत्रालयातील राफेल व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे चोरीस गेल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयामध्ये केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी करा, अशी मागणी केल्याने सरकारची कोंडी झाली होती. ""विरोधी पक्ष राफेल व्यवहारासंदर्भातील फायली चोरीस गेल्याचा दावा करत असले तरीसुद्धा, तो पूर्णपणे चुकीचा आहे, असे वेणुगोपाल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी न्यायालयाने पूर्वी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयामध्ये सादर केली होती. तत्पूर्वी न्यायालयाने राफेल व्यवहाराच्या चौकशीचे आदेश देण्यास नकार दिला होता. याच निर्णयाचा फेरविचार करावा असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते, या वेळी याचिकाकर्त्यांनी मूळ कागदपत्रांच्या फोटो कॉपी आपल्या अर्जाला जोडल्या होत्या, असे ऍटर्नी जनरल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, न्यायालयीन युक्तिवादादरम्यान वेणुगोपाल यांनी कागदपत्रे चोरीस गेल्याचे नमूद केले होते. हा शब्द त्यांनी टाळला असता तर एवढे रामायणच झाले नसते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT