देश

हार्दिकवर दबाव आणण्याचा प्रयत्न: राहुल गांधी

वृत्तसंस्था

अहमदाबाद : पाटिदार नेते हार्दिक पटेलचा एका तरुणीसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या हार्दिकला पाठिंबा देत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हार्दिकवर दबाव आणण्याचा प्रय़त्न केला जात असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले, की अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून हार्दिकवर दबाव आणण्याच प्रय़त्न केला जात आहे. हार्दिक पटेलचा आवाज कोणीच दाबू शकत नाही. गुजरातची दोन मुले महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रजांना भारतातून पळवून लावलेले आहे.

या कथित व्हिडिओ संबंधी हार्दिक पटेलने खुलासा करताना म्हटले होते, की गुजरातमध्ये भाजपच्या घाणेरड्या राजकारणाला सुरवात झाली आहे. कितीही बदनामी केली तरी मला फरक पडणार नाही, पण गुजरातमधील महिलांचा अपमान केला जात आहे गुजरातमधील सहा कोटी जनता माझ्यासोबत आहे. भाजपविरोधातील लढा सुरूच राहणार. भाजपची जुनी सवय आहे. संजय जोशी लोकप्रिय होत असताना भाजपने हीच खेळी खेळली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT