congress Rahul Gandhi News Sakal
देश

Rahul Gandhi: राहुल गांधींसाठी काँग्रेसचा मेगा प्लॉन! मिशन कर्नाटकमधून मोदींना देणार चोख प्रत्युत्तर

रुपेश नामदास

राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक मूडमध्ये आहे. या मद्द्यावरून देशात शुक्रवारी अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.तर काँग्रेस हायकमांडमध्ये बैठकांचा फेरा सुरू झाला आहे.

शुक्रवारी या मुद्द्यावर काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली झाली.या बैठकीत प्रियंका गांधी आक्रमक झाल्याचे सांगितले जाते.त्यांनी पक्षाला कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. तर कर्नाटकात मधून मोदींना उत्तर देण्याचं त्यांनी बैकीत सांगितलं आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, "या सरकारला अदानींवर उत्तर द्यायचे नाही. राहुल गांधी लढतील आहेत त्यांच्यासोबत आम्ही सगळे लढू, शहीदांचे रक्त आमच्या नसात आहे. आज जे काही घडले ते लोकशाहीसाठी घातक आहे.

ते कुटुंबावर टीका करत राहतात. त्यांच्या विरोधात कोणत्याही न्यायालयाने निकाल दिलेला नाही. ज्या रक्ताला तुम्ही वारंवार कुटुंबवादी म्हणत आहात, ते रक्त या देशासाठी सांडले आहे. आम्ही मागे हटणार नाही, आम्ही लढणार आहोत. आमच्या शरीरात शहीदांचे रक्त आहे."

दरम्यान अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाकडून दिलासा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.राहुल गांधींचं हे प्रकरण देशभरात पोहचवण्याचे आव्हान अशोक गहलोत यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

तर खासदार रवनीत बिट्टू यांनी सामूहिक राजीनामा देण्याचे आव्हान केले आहे. मात्र यावर अजून पर्यत एकमत झाले नाही. रविवारी राजघाटावर निषेधाचा कार्यक्रम झाल्यास सोमवारपासून काँग्रेस देशभरात आंदोलन सुरू करणार आहे. यासोबत काँग्रेसने आरोप केला आहे की अदानी प्रकरण दाबण्यासाठी हे षडयंत्र रचल आहे.

भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीला नवी उमेद देणाऱ्या राहुल गांधींचे भवितव्य आता अनिश्चित दिसत आहे. लोकसभा सचिवालयाचे हे पत्र छापायला 19 सेकंदही लागले नसते. त्यामुळे राहुल गांधींच्या 19 वर्षांच्या अखंड संसदपटूंचा कार्यकाळ संपला.

न्यायालयाने राहुलच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर राहुल गांधी आठ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. याचा अर्थ असा की, या वर्षी जूनमध्ये 53 वर्षांचे होणारे राहुल हे वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत खासदार होण्याची अपेक्षा करू शकत नाहीत आणि जर मध्यावधी निवडणुका झाल्या नाहीत, तर ते 2034 मध्ये पुढील सार्वत्रिक निवडणूक लढवू शकतील. तेव्हा ते ६५ वर्षांचे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup 2025 Final: दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध जिंकला टॉस; पावसाच्या व्यत्ययानंतर सामन्याला सुरुवात होणार...; पाहा प्लेइंग इलेव्हन

Mexico Blast: भीषण! सुपरमार्केटमध्ये भयंकर स्फोट; २३ जणांचा मृत्यू, ४ चिमुकल्यांचाही समावेश, १२ जण जखमी

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! लाखो रुपयांचा पगार मिळणार; 'असा' करा अर्ज

VIDEO : मुद्दे मी देतो, तुम्ही आंदोलन करून दाखवा! 'मॅनेज झाले' म्हणणाऱ्यांना बच्चू कडूंनी चांगलंच झापलं, नेमकं काय दिलं उत्तर? वाचा...

World Cup 2025 Final: पाऊस असाच सुरू राहिला तर २०-२० षटकांची होईल फायनल! जाणून घ्या कधी व किती वाजता लागू होईल हा नियम...

SCROLL FOR NEXT