Rahul Gandhi esakal
देश

Rahul Gandhi: ओम बिर्लांच्या 'त्या' विधानामुळे राहुल गांधी नाराज; भेटीनंतर म्हणाले, त्यांनी असं...

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांसमोरच आपली नाराजी बोलून दाखवली. लोकसभेच्या अध्यक्षांनी अशा प्रकारे राजकीय प्रस्ताव आणला नाही पाहिजे. दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही लोकसभा अध्यक्षांच्या विधानाविरोधात नाराजी व्यक्त केली.

संतोष कानडे

Rahul Gandhi Expressed Objection: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयावर टीका केली होती. कठोर शब्दांमध्ये त्यांनी आणीबाणीवर भाष्य केलं होतं. शिवाय देशाच्या इतिहासातला तो काळा अध्यात होता, असंही ते म्हणाले होते.

यावरुनच राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांच्या समोर आणीबाणीच्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली आहे. अशा राजकीय प्रस्तावांपासून आपण दूर राहिलं पाहिजे, असंही राहुल गांधी म्हणाले.

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांच्यासह लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, ही औपचारिक भेट होती. ही भेट गुरुवारीच होणार होती, परंतु ओम बिर्ला यांच्या आणीबाणीच्या विधानानंतर काँग्रेसचे नेते नाराज झाले. त्यामुळ ही भेट शुक्रवारी झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांसमोरच आपली नाराजी बोलून दाखवली. लोकसभेच्या अध्यक्षांनी अशा प्रकारे राजकीय प्रस्ताव आणला नाही पाहिजे. दुसरीकडे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही लोकसभा अध्यक्षांच्या विधानाविरोधात नाराजी व्यक्त केली.

''आमच्यासाठीही हे आश्चर्य आहे. अशा पद्धतीने आणीबाणीच्या मुद्द्यावर लोकसभेच्या अध्यक्षांनी बोलणं योग्य नाही. सरकारने जाणीवपूर्वक आजच्याच दिवशी हा मुद्दा पुढे आणला. आज सभागृहात चांगलं वातावरण होतं, परंतु भाजप आणि केंद्र सरकारने वातावरण खराब केलं'' अशी प्रतिक्रिया वेणुगोपाल यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT