Rahul Gandhi sakal
देश

Rahul Gandhi : बिर्लांची भेट घेऊन राहुल गांधींनी केली नाराजी व्यक्त

आणीबाणीच्या प्रस्तावावरून राहुल यांनी मांडली भूमिका.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - आणीबाणीविरोधात काल (ता. २६) लोकसभेमध्ये आलेल्या प्रस्तावामुळे अस्वस्थ झालेल्या ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या समवेत आज लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून आपली नाराजी व्यक्त केली. ‘लोकसभाध्यक्षांची आणीबाणीवरील टिप्पणी राजकीय स्वरुपाची आणि ती टाळता येणे शक्य होते,’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी आपले म्हणणे लोकसभाध्यक्षांसमोर मांडले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे खासदार देखील होते. त्यात सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार), कल्याण बॅनर्जी (तृणमूल कॉँग्रेस), एम के कनिमोळी (द्रमुक) आदींचा समावेश होता. राहुल गांधी आणि अन्य नेत्यांची ही भेट शिष्टाचार भेट होती, असे काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.

तसेच राहुल गांधी यांनी लोकसभाध्यक्षांसमवेत संसदीय कामकाजासोबतच सभागृहात आलेल्या आणीबाणीच्या मुद्द्यावरही चर्चा केल्याचे ते म्हणाले. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल लोकसभेमध्ये अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आणीबाणीविरोधात प्रस्ताव मांडला होता. याविरुद्ध के. सी. वेणुगोपाल यांनी पत्र लिहून उघडपणे विरोध दर्शविला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT