Congress
Congress 
देश

काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा अर्ज दाखल

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक अंतिम टप्प्यात पोचली असून, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहे, त्यामुळे राहुल यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही अर्ज न आल्यास दुपारी तीननंतरच चित्र स्पष्ट होईल. परंतु, मंगळवारी (ता. 5) छाननी पूर्ण झाल्यानंतर अनौपचारिक राहुल यांनी निवड जाहीर होईल. अर्थात, औपचारिक घोषणा अर्ज माघारीच्या अंतिमदिनी म्हणजे 11 डिसेंबरला होणार आहे. 

कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी एक ते चार डिसेंबर उमेदवारी अर्ज भरणे, छाननी पाच डिसेंबर आणि माघारीची अंतिम मुदत 11 डिसेंबर, मतदान (गरज भासल्यास) 16 डिसेंबर असे वेळापत्रक आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असून सकाळी अकरा ते दुपारी तीन अशी वेळ आहे. राहुल गांधी यांनी आज सकाळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेऊन काँग्रेस मुख्यालयात जात उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरताना राहुल यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व कार्यकारिणी सदस्य, कॉंग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, तसेच विधिमंडळ पक्षनेते हे देखील कॉंग्रेस मुख्यालयात हजर होते. 

कॉंग्रेसच्या या निवडणूक प्रक्रियेवर भाजपकडून सातत्याने टीका केली जात असताना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सचिवपदावर असल्याचा दावा करणाऱ्या शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींच्या निवडीला लक्ष्य केले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहजाद पूनावाला यांच्या आक्षेपाचा संदर्भ देत राहुल गांधींना शालजोडीतले फटके लगावले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर वरिष्ठ नेत्यांची हजेरी म्हणजे राहुल यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त करण्यासाठीचे शक्तिप्रदर्शन असेल, असेही मानले जात आहे. 

निवडणूक निर्णय अधिकारी मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व राज्य शाखा, केंद्रशासित प्रदेश शाखा, कार्यकारिणी सदस्य आदींनी 90 अर्ज घेतले आहेत. कार्यकारिणी सदस्यांकडून चार ते पाच संच दाखल केले जातील. यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, ए. के. ऍन्टनी, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद आदी नेत्यांचा समावेश असेल. हे सारे पाहता राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज सुमारे 90 संचांमध्ये दाखल करण्यात आला. सर्व अर्जांवर राहुल गांधींच्या सह्या झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. राहुल गांधी जानेवारी 2013 पासून पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत होते.

कामकाज कोठून 
पक्षाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी कॉंग्रेसचा कारभार कोठून चालवतील, हा देखील प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. कॉंग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल 19 वर्षे (1998 ते 2017) सोनिया गांधी अध्यक्षपदी राहिल्या. या संपूर्ण काळात पक्षाचे मुख्यालय "24 अकबर मार्ग' हे राहिले असले तरी पक्षाची सर्व सूत्रे सोनियांचे निवासस्थान "10 जनपथ' आणि त्यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचे निवासस्थान "23 विलिंग्डन क्रिसेंट' येथूनच हलविली जात होती. सोनिया गांधी मोजक्‍याच वेळी मुख्यालयात येत. राहुल यांच्याबाबतही हाच प्रकार आहे. त्यामुळे ते मुख्यालयातील कार्यालयातून पक्ष चालवतील की आपल्या "12 तुघलक लेन' या बंगल्यातून कॉंग्रेसचे कामकाज बघतील, याबाबत चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT