Sonia Gandhi 
देश

काँग्रेसला टेकू गांधी घराण्याचाच

पीटीआय

नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली. दिवसभरातील चर्चेत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचीच नावे चर्चेत होती. बाकी नावे मागे पडली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या दोन बैठकांमध्ये आणि प्रदेशनिहाय सल्लामसलतीनंतर सहमतीने सोनियांकडे हंगामी नेतृत्व सोपविण्याचा निर्णय झाला.  

काँग्रेस मुख्यालयात सकाळी अकराच्या सुमारास सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीच्या बैठकीस सुरवात झाली. बैठकीत राहुल यांनी राजीनामा मागे घेण्याचा पक्ष नेत्यांचा आग्रह नाकारला. अधीररंजन चौधरी, के. एच. मुनियप्पा यांनी हात जोडून राहुल गांधींना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली, तर सल्लामसलतीअंती तुमचेच नाव अध्यक्षपदासाठी आले तर काय कराल, या पी. चिदंबरम यांच्या सवालावर राहुल गांधींनी बोलण्याचे टाळले. 

राहुल गांधींनी सर्वांचे आभार मानताना, अध्यक्षपद नसले तर सक्रिय राहणार नाही असे समजू नये. उलट आपण अधिक सक्रिय राहू, असे स्पष्ट केल्यानंतर अखेर नव्या नावावर पक्ष नेत्यांचे अभिप्राय जाणून घेण्याचे ठरले. 

सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी मात्र या प्रक्रियेत सहभागी होण्याचे टाळले. अर्थात, सरचिटणीस असलेल्या प्रियांका गांधी मात्र सहभागी झाल्या होत्या. अन्य नेत्यांना खुलेपणाने नव्या नेतृत्त्वाबाबत मतप्रदर्शन करता यावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सोनियांनी सांगितले. उपस्थित सर्व सरचिटणीस, प्रभारी तसेच सचिव यांची प्रदेशनिहाय पाच गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. डॉ. मनमोहनसिंग, प्रियांका गांधी, अंबिका सोनी, तरुण गोगोई, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखालील गटांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. महाराष्ट्रातील नेत्यांनी खर्गे यांना आपले म्हणणे कळवले. हे अभिप्राय ऐकून घेतल्यानंतर पाचही गट प्रमुखांनी आपापले अहवाल तयार केले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पुन्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील दुसऱ्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांच्या संमतीनंतर नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 
रात्री पावणे अकराच्या सुमारास बैठक संपल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी राहुल यांचे आभारही मानले. 

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाला कणखर नेतृत्व दिले. पक्षाला नवी दिशा दिली. त्यांनी चांगल्या पद्धतीने पक्षाची धुरा सांभाळली. अध्यक्षपदावर नसले तरी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ते कायम उपलब्ध असतील आणि  जनतेच्या प्रश्‍नावर आवाज उठवतील. 
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT