congress 
देश

अदानी-अंबानी कायदे रद्द करा; कृषी कायद्यावरुन काँग्रेसची आक्रमक भूमिका

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - एकीकडे दिल्लीच्या सरहद्दीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना हे वादग्रस्त कायदे रद्द करण्यासाठी विरोधी पक्षांनीही सरकारवर दबाव वाढविला आहे. हे अदानी- अंबानी कायदे रद्द करावेच लागतील, असा आक्रमक इशारा काँग्रेस नेते राहुल गांधींनी सरकारला दिला. यासाठी तातडीने संसदेचे अधिवेशन बोलाविण्यासाठी काँग्रेसच्या पंजाबमधील खासदारांनी जंतरमंतरवर आंदोलन केले. 

राहुल गांधींनी केंद्राच्या कृषी कायद्यांची संभावना अदानी अंबानी कायदे अशा शब्दांत केली. अदानी, अंबानी कायदे सरकारला रद्द करावेच लागतील. अन्य काहीही पर्याय मान्य होणार नाही, असे इशारा देणारे ट्विट राहुल गांधींनी केले. हे कृषी   कायदे मागे घेण्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलाविण्याची आवश्यकता आहे. मात्र सरकार अधिवेशनापासून पळ काढून लोकशाहीविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारत बंददरम्यान पंजाबच्या सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसकडून निदर्शने केली जातील, असे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान नव्या संसद भवनासाठी आग्रह करत आहेत. मात्र संसद फक्त इमारतीमधून चालत नाही तर जनतेच्या भावनांनी आणि राज्यघटनेने चालते. राज्यघटनेच्या मूळ भावनेपासून दूर जाऊन सरकारने विज्ञान भवनाला अभिमत संसदेचा दर्जा देऊन टाकला आहे तर नवे संसद भवन बांधण्याची गरज काय, असा टोला  जाखड यांनी सरकारला लगावला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेमध्ये लॉबिंगची परंपरा आहे. भारतात सरकार सावकारांसाठी लॉबिंग करत आहे. हे जनतेला मान्य होणार नाही, याची दखल पंतप्रधानांना घ्यावी लागेल आणि हे काळे कायदेही मागे घ्यावे लागतील. सरकारला विरोधकांचे म्हणणे ऐकायचे नसेल तर किमान स्वदेशी जागरण मंच, किसान संघाचे म्हणणे त्यांनी ऐकावे.
- सुनील जाखड, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पंजाब

कायद्यांतील बदल आवश्‍यक - मोदी
आग्रा - शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा कायद्यातील बदलांचा आग्रह धरला. विकासासाठी कायद्यातील बदल आवश्‍यक आहेत. काही कायदे मागील अनेक शतकांपासून ओझे बनले होते, असेही मोदींनी नमूद केले.

मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज आग्रा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांचे प्रतिबिंब हे निवडणुकीच्या निकालातून देखील दिसून आले असेही ते म्हणाले. यावेळी मोदींनी शेतकरी आंदोलनाचा थेट उल्लेख करणे मात्र टाळले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT