Rahul Gandhi esakal
देश

नेता असावा तर असा! रस्त्यात ताफा थांबवून अपघातग्रस्ताला राहुल गांधींनी केली मदत

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या त्यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाडच्या दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या त्यांचा लोकसभा मतदारसंघ वायनाडच्या (Wayanad Lok Sabha constituency) दौऱ्यावर आहेत. केरळमध्ये राहुल गांधींचा तीन दिवसांचा दौरा असणार आहे. ते शुक्रवारी वायनाडमध्ये दाखल झाले आहेत.

एकता संमेलनात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी वंदूर इथं पोहोचले होते. या कार्यक्रमातून परतत असताना वाटेत अपघात झालेल्या व्यक्तीला राहुल गांधींनी त्यांचा ताफा थांबवत अपघातग्रस्ताला मदत केली. एवढंच नाही, तर गांधींनी त्या अपघातग्रस्ताला आपल्या ताफ्यात धावणाऱ्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात एका अपघातग्रस्ताला मदत केली. शिवाय, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली. पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन गांधी हॉटेलकडं परतत असताना रस्त्यात मोटारसायकलनं एका व्यक्तीला धडक दिली होती. यावेळी अपघातग्रस्त व्यक्ती मदतीची अपेक्षा करत असताना राहुल गांधींनी आपला ताफा थांबवत त्याला मदत केली. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेता स्थानिक गर्दीच्या मधोमध उभा राहून एका अपघातग्रस्ताला रुग्णवाहिकेत बसवताना दिसत आहे. अपघातातील व्यक्तीचं नाव अबुबकर असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT