Rahul Gandhi in defamation case  esakal
देश

Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधींच्या आधी 'मोदी'च पोहचले सुप्रीम कोर्टात!

रोहित कणसे

नवी दिल्ली - मोदी अडनावासंदर्भात गुजरात हायकोर्टाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. यानंतर आता राहुल गांधी यांच्याकडून शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे. मात्र यापूर्वीच मोदी आडनावाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला आहे.

राहुल गांधी यांची याचिका गुजरात हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आता भाजप आमदार पूर्णेश मोदीच पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले आहेत. राहुल गांधी यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होण्यापूर्वी आमदार पूर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.

राहुल गांधी यांना मोदी आडनावाचा उल्लेख करत केलेल्या टीकेबद्दल 2019 च्या मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच या सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याच्या काही दिवसानंतर मोदी सुप्रिम कोर्टात गेले आहेत. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यास त्यांची बाजूही ऐकून घेतली जावी, असे पूर्णेश मोदी यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.

दरम्यान या मानहानी खटल्यात शिक्षा झाल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. तसेच राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केल्याचा आरोप करत काँग्रेसकडून मौन आंदोलने केली जात आहेत. लवकरच राहुल गांधी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT