Rahul Gandhi esakal
देश

Gujarat Assembly Election : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला अस्मान दाखवू - राहुल गांधी

‘‘अयोध्येमध्येच भाजपचा धुव्वा उडवून ‘इंडिया’ आघाडीने कधीकाळी लालकृष्ण अडवानी यांनी सुरू केलेल्या राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला आहे. पुढील गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत देखील भाजपला अस्मान दाखवू,’’

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : ‘‘अयोध्येमध्येच भाजपचा धुव्वा उडवून ‘इंडिया’ आघाडीने कधीकाळी लालकृष्ण अडवानी यांनी सुरू केलेल्या राम मंदिर आंदोलनाचा पराभव केला आहे. पुढील गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत देखील भाजपला अस्मान दाखवू,’’ अशी गर्जना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केली.

‘‘ या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने अयोध्येत भाजपचा पराभव करण्यात आला होता तशाच प्रकारचा पराभव गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत करण्यात येईल, त्यांनी अहमदाबादेतील आमचे कार्यालय फोडले आम्ही आता त्यांचे सरकार फोडू,’’ असा इशारा देत राहुल यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते येथे मेळाव्यात बोलत होते. दरम्यान विरोधी पक्ष नेते बनल्यानंतर राहुल हे सोमवारी (ता.८) मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. येथे ते स्थानिकांच्या समस्याही जाणून घेतील.

राहुल म्हणाले

  • रामाच्या प्राणप्रतिष्ठेला अदानी-अंबानी दिसले

  • निवडणुकीत रामाने भाजपलाही तारले नाही

  • अवधेश यांना अयोध्येत विजयाची खात्री होती

  • अयोध्येत जमिनीचा योग्य मोबदला नाही

  • अयोध्येत शेतकऱ्यांना योग्य भरपाई नाही

प्रदेश काँग्रेसवर टीका

गुजरात प्रदेश काँग्रेसमधील त्रुटींवर भाष्य करताना राहुल म्हणाले, ‘‘ प्रदेश पातळीवर आमची नेतेमंडळी शर्यतीच्या घोड्यांना लग्नामध्ये आणि विवाहसोहळ्यातील घोड्यांना शर्यतीमध्ये जुंपण्याचे काम करतात. मागील वेळेस आपण भाजपच्याविरोधात योग्य पद्धतीने लढलो नाहीत. आता आमच्याकडे तीन वर्षे आहेत. तुम्ही तीस वर्षांनंतर गुजरात जिंकणार आहात. मी आणि माझी बहीण तुमच्यासोबत उभे आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT