Rahul Gandhi Esakal
देश

Rahul Gandhi : 'हिजाब परिधान करणाऱ्या महिलांबद्दल तुम्हाला काय वाटतं?' विद्यार्थ्यीनीच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी म्हणाले, 'महिलांना...'

Rahul Gandhi on Hijab: अलीगढ विद्यापीठातील एका विद्यार्थ्यीनीने राहुल गांधींना विचारले की, भविष्यात ते देशाचे पंतप्रधान झाले तर हिजाब परिधान करणाऱ्या महिलांबाबत त्यांचे मत काय? यावर राहुल गांधी म्हणाले की, महिलांना जे हवे ते परिधान करण्याचा अधिकार आहे, असे माझे मत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशात सुरू आहे. यादरम्यान राहुल गांधी अलीगड विद्यापीठात पोहोचले आणि त्यांनी तेथील विद्यार्थिनींची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिक्षण, अधिकार आणि महिलांचे अभिव्यक्ती या विषयांवर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी एका विद्यार्थ्यीनीने राहुल गांधींना विचारले की, भविष्यात आपण देशाचे पंतप्रधान झाला तर हिजाब परिधान करणाऱ्या महिलांबाबत त्यांचे काय मत आहे? यावर राहुल गांधी म्हणाले की, महिलांना जे हवे ते परिधान करण्याचा अधिकार आहे, असे माझे मत आहे. महिलांना काय परिधान करावे हे पूर्णपणे त्यांच्यावर निर्भर आहे.

महिलांनी काय परिधान करावे ही त्यांची जबाबदारी आहे, असे माझे मत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी काय परिधान करावे हा त्यांचा निर्णय आहे. त्यांनी काय घालायचे हे इतर कोणी ठरवावे असे मला वाटत नाही.

महिलांच्या राजकारणातील सहभागावर राहुल गांधी काय म्हणाले?

यावेळी त्यांना महिलांच्या राजकारणातील सहभागाबाबत विचारले असता ते म्हणाले की, राजकारण आणि व्यवसायात महिलांना पूर्ण प्रतिनिधित्व दिले जात नाही. त्यासाठी महिला उमेदवारांना जास्तीत जास्त संधी द्यावी, याचा विचार सर्वच राजकीय पक्षांना करावा लागेल. पक्षांनी महिलांना प्रोत्साहन द्यावे. आपल्या देशाच्या राजकीय रचनेत महिलांचा समावेश झाला पाहिजे.

राहुल गांधी म्हणाले की, स्थानिक पातळीवर राजकारणात आजही महिलांचे अस्तित्व दिसून येते, त्या प्रधान किंवा नगरसेवकाच्या पातळीपर्यंत पोहोचतात, पण त्याहूनही वरचा मुद्दा आमदार किंवा खासदाराचा येतो तेव्हा महिला क्वचितच दिसतात. अशा परिस्थितीत महिलांना प्रोत्साहन द्यावे लागेल.

भाजप कायद्याचा दुरुपयोग

अलिगढ विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने राहुल गांधींना आसाममधील एनआरसीबद्दल विचारले. त्यावर राहुल म्हणाले की, भाजप देशातील कायदे शस्त्रे बनवून वापरत आहे. ते भेदभावाचे राजकारण करत असून त्यातून कोणाचाही फायदा होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT