Rahul Gandhi Slam BJP PM Modi Over Reservation during lok sabha election campaign political marathi news  
देश

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

तेलंगणमधील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात आज राहुल गांधी यांची प्रचारसभा झाली.

रोहित कणसे

हैदराबाद, ता. ५ (पीटीआय) : ‘‘पंतप्रधान मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात होते आणि आताही त्यांना जनतेचे आरक्षण काढून घ्यायचे आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला. देशात आता आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेण्याची गरज आहे, असे मतही राहुल यांनी व्यक्त केले.

तेलंगणमधील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात आज राहुल गांधी यांची प्रचारसभा झाली. यावेळी ते म्हणाले,‘‘यंदाची लोकसभा निवडणूक ही विचारांची लढाई आहे. आम्ही राज्यघटना वाचविण्याचा प्रयत्न करत आहोत, तर भाजप आणि रा. स्व. संघाला लोकांचे हक्क नष्ट करायचे आहेत. नरेंद्र मोदी हे प्रथमपासूनच आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यांना जनतेचे आरक्षण काढून घ्यायचे आहे. मात्र, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक वाढविण्याची खरी गरज आहे. सत्तेत आल्यास ही मर्यादा वाढवू, असे आम्ही जाहीरनाम्यातच स्पष्ट केले आहे.’’


पंतप्रधान मोदी हे सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करत असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला. ‘‘विविध क्षेत्रांमध्ये या सरकारने कंत्राटीकरण सुरू केले. आरक्षण काढून टाकण्यासाठीच हे पाऊल उचलले आहे. आम्ही सत्तेत आल्यास ही पद्धत बंद करू. नोकऱ्या कायमस्वरूपी असतील, तात्पुरत्या नसतील. या सरकारला मात्र राज्यघटनाचा समाप्त करायची असल्याने आरक्षण ते रद्द करतीलच. दलित, मागासवर्गीय, आदिवासी हे कायमच अविकसित राहावेत, अशीच भाजपची इच्छा आहे,’’ असा आरोपही राहुल यांनी केला. तेलंगणमध्ये सत्तेत आल्यावर आधी आश्‍वासन दिल्यानुसार आम्ही महिलांना बसमधून मोफत प्रवास सुरू केला, असेही राहुल यांनी निदर्शनास आणून दिले.

राहुल गांधी म्हणाले
- जातीनिहाय जनगणना करू
- गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देऊ
- राज्यघटनेचे संरक्षण करू
- देशातील जनतेला ‘न्याया’ची गॅरंटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणार, अजित पवारांनी दिले संकेत

R Ashwin नंतर आणखी एक फिरकीपटू निवृत्त! ८ वर्ष टीम इंडियात पुनरागमनाची वाट पाहिली, अखेर निर्णय घेतलाच...

जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर शिंदे गटाच्या 'या' खासदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली मोठी मागणी, पत्रावरुन वाद चिघळण्याची शक्यता!

Latest Marathi News Updates : मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात ओबीसी समाज रस्त्यावर

OBC Agitation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अतुल सावेंचे आश्वासन; बबनराव तायवाडेंनी पाणी घेऊन सोडले उपोषण

SCROLL FOR NEXT