Rahul Gandhi esakal
देश

पक्षातील नेते साथ सोडत असताना राहुल गांधी पुन्हा परदेश दौऱ्यावर

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असताना काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी (Gujarat Assembly Election) काँग्रेसमधील (Congress) बडे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यातच आता राहुल गांधी देखील परदेश दौऱ्यावर निघून गेले आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) काल तिथल्या भारतीयांना संबोधित करण्यासाठी लंडनला (London) रवाना झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी 'आयडियाज फॉर इंडिया' या परिषदेत सहभागी होणार आहेत.

काँग्रेस मीडिया विभागाचे प्रमुख आणि सरचिटणीस रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी सांगितलं की, राहुल गांधी अनिवासी भारतीयांशीही देशाच्या वर्तमान आणि भविष्याबाबत संवाद साधतील. 23 मे रोजी राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात (Cambridge University) 'आधुनिक भारतासाठी आव्हानं आणि मार्ग' या विषयावर उपस्थित लोकांशी संवाद साधणार आहेत. लंडनमध्ये आज 'आयडियाज फॉर इंडिया' हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि प्रियांक खर्गे हे देखील उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असताना काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. त्यामुळं पक्षात सध्या चिंतेचं वातावरण आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीत भारतीय जनता पक्ष पूर्णपणे गुंतला असताना हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसची साथ सोडलीय. यापूर्वी काँग्रेसचे माजी पंजाब युनिट प्रमुख सुनील जाखड यांनी देखील क्षाला सोडचिठ्ठी दिलीय. त्याचवेळी काँग्रेसनं निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्याशी मॅरेथॉन चर्चा केली. त्यांनी पक्षाच्या समितीत सहभागी होण्याची ऑफर नाकारलीय. यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं काँग्रेसनं उदयपूर, राजस्थान इथं चिंतन शिबिराचं आयोजन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT